#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका – eNavakal
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा जिंकून जोकोला नवा इतिहास रचण्याची संधी आहे. ही स्पर्धा त्याने जिंकल्यास टेनिस विश्‍वातील चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा दुसर्‍यांदा जिंकणारा तो केवळ दुसरा खेळाडू ठरू शकतो. पण त्याचा विजयाचा रस्ता ओपन आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या जोकोला नुकत्याच झालेल्या रोम आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अंतिम सामन्यात नादालकडून हार खावी लागली होती. जोकोने 2016 मध्ये चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पहिल्यांदा पराक्रम केला होता. गतवर्षी जोकोने विम्बल्डन आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या. तर यंदा ऑस्ट्रेलियन पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा जोकोनेच जिंकली होती. आतापर्यंत त्याने 15 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या. फेडररने 20 आणि नादालने 17 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या. डॉन बज आणि रॉड लेवरने दोन वेळा चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. 37 वर्षीय फेडरर 2015 नंतर पुन्हा एकदा फ्रेंच स्पर्धेत खेळणार आहे. तर नादालने विक्रमी 11 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. फेडररने ही स्पर्धा जिंकल्यास तो ही स्पर्धा जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More
post-image
लेख

परामर्ष : इंग्रजीमुळे राष्ट्रभाषा कुपोषित

हिंदी भाषा दिवसाच्या निमित्ताने देशभरात विशेषतः हिंदी भाषिक राज्यांमध्ये बरेच कार्यक्रम झाले. परंतु अन्य राज्यांमध्ये या राष्ट्रभाषेविषयी हवी तशी आस्था दाखवली गेलेली नाही. किंबहुना...
Read More