#fifaworldcup2018 रात्री 11:३० वाजता पोर्तुगाल वि. उरुग्वे; रोनाल्डो आणि सुराझवर लक्ष – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

#fifaworldcup2018 रात्री 11:३० वाजता पोर्तुगाल वि. उरुग्वे; रोनाल्डो आणि सुराझवर लक्ष

सोची – विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीतला पहिला सामना आज रात्री 7.30 वाजता खेळविण्यात येईल. अर्जेंटिना-फ्रान्स संघातील हा पहिला सामना कझान एरिनात होणार आहे. तर उपउपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना आज रात्री 11.30 वाजता सुरु होईल. या सामन्यात पोर्तुगाल-उरुग्वे संघ आमनेसामने उभे ठाकतील. जागतिक क्रमवारीत पोर्तुगाल चौथ्या क्रमांकावर तर जागतिक क्रमवारीत उरुग्वे चौदाव्या क्रमांकावर आहेत.

उरुग्वने यापूर्वी ही स्पर्धा जिंकली आहे. पोर्तुगाल संघ मात्र आपल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. पोर्तुगालची मदार त्यांचा कर्णधार आघाडी फळीतील स्टार खेळाडू रोनाल्डोवर असेल. त्याने या स्पर्धेत पहिल्याच लढतीत शानदार हॅट्ट्रिक करून पोर्तुगालच्या विजयाचे अभियान सुरू केले होते. मेस्सीप्रमाणेच पोर्तुगालची मदार कर्णधार रोनाल्डोवरच या लढतीत राहणार आहे, तर उरुग्वे संघाची मदार त्यांच्या आघाडी फळीतील प्रमुख खेळाडू लुईस सुराझवर असेल. त्याने 2 सामन्यांत 2 गोल करून आपल्या संघाच्या विजयात पहिला टप्प्यात मोठी भूमिका बजावली होती. त्याचा सहकारी एडिसन कावानी हादेखील खेळाडू पोर्तुगालसाठी धोकादायक ठरू शकतो.

जोरदार आक्रमण हीच दोन्ही संघांची वैशिष्ट्ये आहेत, पण त्यामानाने दोन्ही संघांचा बचाव मात्र काहीसा कमकुवत आहे. या लढतीत पोर्तुगाल 4-3-3-1 अशी, तर उरुग्वे 4-4-2-1 अशी व्यूहरचना करण्याची शक्यता आहे. रोनाल्डो विरुद्ध सुराझ यांच्यात हा मुकाबला रंगणार आहे.

आजचे सामने फुटबॉल फीव्हर

सामना क्रमांक 1 – अर्जेंटिना – फ्रान्स
रात्री 7.30 वाजता
ठिकाण – कझान

सामना क्रमांक 2 – पोर्तुगाल – उरुग्वे
रात्री 11.30 वाजता
ठिकाण – सोची

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कमलनाथ की ज्योतिरादित्य? गेहलोत की सचिन पायलट? अनुभवी की युवा?

जयपूर – राजस्थानात काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्याने आजच सायंकाळी 7 वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पाडण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला. मात्र निवडणूक निकाल...
Read More
post-image
मुंबई

मुंबईतील पाणी प्रश्न स्थायी समितीत पेटला

मुंबई  – मुंबईतील पाणी प्रश्न आज बुधवारी पालिका स्थायी समितीत चांगलाच पेटला सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक होत पालिकेला धारेवर धरले पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची मागणी...
Read More
post-image
देश

चंद्रशेखर राव आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हैदराबाद – तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ़घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, निमंत्रित पाहुणे उपस्थित...
Read More
post-image
मुंबई

मुंबईत वातावरणातील बदलाने आजार बळावले

मुंबई – दिवसा रणरणते ऊन आणि रात्रीचा गारवा वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, दमा, त्वचारोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर...
Read More
post-image
विदेश

ब्राझीलच्या कँपीनास शहरात गोळीबारात 5 ठार

साओ पाउलो- ब्राझीलच्या कँपीनास शहराती एका चर्चमध्ये बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारात 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या घटनेनंतर गोळीबार करणार्‍या व्यक्तीनेही स्वतःवर गोळ्या...
Read More