#FifaWorldCup2018 माजी विश्वविजेत्या फ्रान्सला बेल्जियम रोखणार का? – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

#FifaWorldCup2018 माजी विश्वविजेत्या फ्रान्सला बेल्जियम रोखणार का?

सेंट पीटर्सबर्ग – विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उद्या माजी विजेत्या फ्रान्स आणि बेल्जियम या दोन संघात पहिला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या लढतीत बलाढ्य फ्रान्स संघाला पराभूत करून बेल्जियम संघ प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणार का? याबाबत दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पसरली आहे. या स्पर्धेत आपले सर्व सामने जिंकणारा बेल्जियम हा एकमेव संघ आहे. उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमने तब्बल 5 वेळा ही स्पर्धा जिंकणार्‍या ब्राझीलला पराभूत करून स्पर्धेत मोठीच खळबळ माजवली होती. जागतिक क्रमवारीत बेल्जियम तिसर्‍या तर फ्रान्स सातव्या क्रमांकावर आहे. विश्वचषक स्पर्धेत हे दोन संघ तिसर्‍यांदा आमने-सामने येत आहेत. पहिल्या दोन्ही लढतीत फ्रान्सनेच बाजी मारली आहे.

आता उद्याची लढत जिंकून बेल्जियम संघ नवा इतिहास रचणार का? याकडे त्यांच्या तमाम चाहत्याचे लक्ष्य लागले आहे. फ्रान्सचे आक्रमण आणि बेल्जियमचा भक्कम बचाव यामध्ये ही लढत रंगणार आहे. बेल्जियमचा भक्कम बचाव भेदण्याचे मोठे आव्हान फ्रान्स संघासमोर असेल. बेल्जियमचा हेजार्ड आणि फ्रान्सचा एम्बापे या दोन युवा खेळाडूंमधील ही लढत चांगलीच रंगणार आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बेल्जियम संघ चांगलाच खणकर आहे. फ्रान्सपेक्षा या स्पर्धेत आतापर्यंतच्या लढतीत बेल्जियमने सरस खेळ केला आहे. त्या तुलनेत फ्रान्सला मात्र तेवढी चांगली कामगिरी करता आलेली नाही. बेल्जियम संघाचे प्रशिक्षक मार्टिनेज हे नवी रणनीती आखण्यात वाकपगार आहेत. त्याच रणनीतीच्या आधारे बेल्जियमने बलाढ्य ब्राझीलला धूळ चारली होती. त्यांच्या आघाडी फळीत हे हेजार्ड, मार्टिन, लुकाकु यांच्यावर मोठी मदार असेल, तर बचाव फळीत केव्हीन, व्हीटेसेल, थॉमस यांच्यावर त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे. गोलरक्षक कोएनने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. दोन्ही संघाचे बरेचसे खेळाडू युरोपमधील बलाढ्य क्लबतर्फे खेळत असल्यामुळे दोन्ही संघांना आपल्या खेळाचा चांगला अंदाज आहे. बेल्जियमने या स्पर्धेेत आता पर्यंत 14 गोल केले आहेत. त्या तुलनेत फ्रान्सला मात्र जास्त गोल करता आलेले नाही. फ्रान्सची मदार मार्टिनेज, ग्रिजमेन, फेलानी आणि चार्डी यांच्यावर असणार आहे. उभय संघातील ही लढत अटीतटीची आणि चुरशीची होणार असाच अंदाज आहे. या लढतीत फ्रान्स संघ 4-3, 2-2-1 अशी व्यूहरचना आखण्याची शक्यता आहे. फ्रान्सकडे एकापेक्षा एक सरस खेळाडूंचा भरणा आहे. तर बेल्जियम संघात मात्र तसा स्टार खेळाडू कोणीच नाही. संघातील सर्वच खेळाडूंनी त्यांच्या विजयात हातभार लावला आहे. कागदावर तरी फ्रान्सचे पारडे थोडे जड आहे. उभय संघात तब्बल 73 सामने आतापर्यंत झाले आहेत. त्यामध्ये बेल्जियमने 30, फ्रान्सने 24 सामने जिंकले आहेत. तर 19 सामने बरोबरीत सुटले आहेत. स्पर्धेच्या पहिला टप्प्यात बेल्जियमने, पनामा, ट्युनेशिया, इंग्लंड आणि जपानचा पराभव केला. तर उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांनी बलाढ्य ब्राझीलला नमवण्याची कामगिरी केली होती. फ्रान्सने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना. ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, अर्जेंटिना आणि उरुग्वेला पराभूत केले होते. तर डेन्मार्कने त्यांना बरोबरीत रोखले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग

मुंबई – वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

गोविंदाच्या ‘रंगीला राजा’चा ट्रेलर पाहिलात?

मुंबई – अभिनेता गोविंदाचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘रंगीला राजा ही दोन भावांची गोष्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश हवामान

उत्तराखंडमध्ये गारांसह बर्फवृष्टी

देहरादून – उत्तराखंडमध्ये मागील अनेक दिवसांपासून हवामान सतत बदलत आहे. आजही सकाळपासून हिमालयाच्या उंच पर्वत रांगेवर जोरदार पाऊस कोसळत आहे. बदरीनाथमध्ये बर्फवृष्टी होत आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

मॅच फिक्सिंगप्रकरणी ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरची कबुली

लाहोर – पाकिस्तानी डावखुरा गोलंदाज दानिश कनेरियाने मॅच फिक्सिंगचे आरोप स्विकारले आहेत. मॅच फिक्सिंग प्रकरणात त्याचा सहखेळाडू मर्वेन वेस्टफील्डला तुरुंगवास भोगाावा लागला. कनेरियाने तब्बल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

तब्बल ५० कोटी मोबाईल नंबर बंद होणार?

नवी दिल्ली – देशातील जवळपास ५० कोटी मोबाईलधारकांचे सिम ‘डिस्कनेक्ट’ होण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्या मोबाइल सिम कार्ड पडताळणीसाठी आधारचा वापर करू शकत नाहीत, असा निर्णय...
Read More