#FifaWorldCup2018 फ्रान्स अंतिम फेरीत दाखल – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

#FifaWorldCup2018 फ्रान्स अंतिम फेरीत दाखल

सेंट पिटर्सबर्ग – फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य लढतीत फ्रान्सने बेल्जियमला 1-0 फरकाने नमवून अंतिम फेरीत जोरदार धडक दिली. या सामन्यात फ्रान्सचा बचावपटू उमटिटी याने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर फ्रान्सने सामना जिंकला. १९९८ पासून तिसऱ्यांदा फ्रान्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत फ्रान्सचा मुकाबला इंग्लंड-क्रोएशिया यांच्यातील विजयी संघाविरुद्ध होईल.

दुसऱ्या सत्रात 51 व्या मिनिटाला सॅम्युअल उमतिटीने केलेल्या एकमेव गोलाच्या बळावर फ्रान्सने पहिल्या उपांत्य लढतीत बेल्जियमला 1-0 अशा फरकाने नमवत फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या फायनल्समध्ये जोरदार धडक दिली. सेंट पीटर्सबर्ग स्टेडियमवर झालेल्या या रोमांचक सामन्यात बेल्जियमने तोडीस तोड लढत देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, अखेरीस उमतिटीचा गोलच निर्णायक ठरला.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांनाही गोल करता आला नव्हता. बेल्जियमने या लढतीच्या पहिल्या 15 मिनिटातच जोरदार घमासान खेळ साकारला होता. पण, केवळ फिनिशिंगच्या अभावामुळे त्यांना या प्रयत्नांचे गोलमध्ये रुपांतर करता आले नव्हते. फ्रान्सचा गोलरक्षक लोरिसचे अप्रतिम गोलरक्षण देखील तितकेच लक्षवेधी ठरले. फ्रान्सने एका गोलाची आघाडी घेतल्यानंतर मात्र या लढतीत चित्र थोडेसे बदलले. दुसऱ्या सत्राच्या सहाव्या मिनिटाला उम्मिटीेने निर्णायक गोल करत फ्रान्सला अंतिम फेरीत पोहोचण्यात मोलाची भूमिका बजावली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

निम्म्या कोल्हापुरात आज पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर – महापालिकेकडून कावळा नाका येथे पाण्याच्या टाकीखालील पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम आज सोमवारी हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या टाकीवर अवलंबून असलेल्या भागातील पाणीपुरवठा बंद...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आजपासून कुलभुषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली – कुलभषण जाधव यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज सोमवार 18 फेब्रुवारी पासून जाहीर सुनावणी सुरू होणार आहे. द हेग...
Read More
post-image
संपादकीय

(संपादकीय) अरे…सांत्वनाचे सौजन्य तरी पाळा

देशाच्या एकजूटीचे बळ कितीतरी प्रचंड असू शकते. हे अभूतपूर्वरीतीने दिसून आले आहे. सव्वाशे कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येचा हा देश अनेक राज्य, अनेक भाषा, धर्म, पंथ,...
Read More
post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More