#FifaWorldCup2018 कोलंबियाविरुद्धच्या लढतीत इंग्लंडची मदार हेरी केनवर – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

#FifaWorldCup2018 कोलंबियाविरुद्धच्या लढतीत इंग्लंडची मदार हेरी केनवर

मॉस्को – विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उद्या होत असलेल्या बाद फेरीच्या सामन्यात कोलंबियाविरुद्धच्या लढतीत इंग्लंड संघाची मदार राहणार आहे ती त्यांच्या कर्णधार आणि आघाडी फळीतील स्टार खेळाडू हेरी केन यांच्यावर स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात इंग्लंडच्या विजयात त्यांनेच मोठी भूमिका बजावली. या स्पर्धेत 5 गोल करून सर्वाधिक गोल करणार्‍या खेळाडूंमध्ये टोप पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडसाठी महत्त्वाची भूमिका केनलाच बजवावी लागणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ट्युनिशिया आणि पनामा या संघाविरुद्ध इंग्लंडशी म्हणावी तशी कसोटी लागली नाही. आता खरा कस त्यांच्या उद्याच्या कोलंबियाविरुद्धच्या लढतीत लागणार आहे. जागतिक क्रमवारीत इंग्लंड 12व्या आणि कोलंबिया 16 व्या क्रमांकावर आहे. केनबरोबरच जेमी, रहीम, गॅरी, जोन्स, या युवा खेळाडूकडून देखील इंग्लंड संघ मोठ्या अपेक्षा बाळगून असेल, कोलंबियांची मदार अर्थातच त्यांच्या आघाडी फळीतील स्टार खेळाडू जेम्स रॉड्रिक्स लेजवर असेल, गेल्या स्पर्धेत त्याने सर्वाधिक गोल केले होते. अनुभवी नेस्टर आणि पेकरमन हे कोलंबियाचा बचाव भक्कमपणे सांभाळतील. जेम्सबरोबरच आघाडी फळी डेव्हीड सन आणि येरी मीना यांच्याकडून देखील कोलंबिया संघ चांगला कामगिरीची अपेक्षा करत असेल, कोलंबियाचा भक्कम बचाव आणि इंग्लंडचे जोरदार आक्रमण अशी लढत रंगणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही संघाने 2-2 विजय मिळवले होते. तर 1-1 लढत गमावली होती. गेल्या स्पर्धेत कोलंबियाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. तर इंग्लंड संघाचा पहिल्या टप्प्यातच पॅकअ‍ॅप झाले होते. उद्याच्या या लढतीत इंग्लंड संघ 3-4, 2-1 अशी व्यूहरचना आखेल, तर कोलंबियन संघ 4-4, 2-1, अशी व्यूहरचना आखण्याची शक्यता आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

निम्म्या कोल्हापुरात आज पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर – महापालिकेकडून कावळा नाका येथे पाण्याच्या टाकीखालील पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम आज सोमवारी हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या टाकीवर अवलंबून असलेल्या भागातील पाणीपुरवठा बंद...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आजपासून कुलभुषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली – कुलभषण जाधव यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज सोमवार 18 फेब्रुवारी पासून जाहीर सुनावणी सुरू होणार आहे. द हेग...
Read More
post-image
संपादकीय

(संपादकीय) अरे…सांत्वनाचे सौजन्य तरी पाळा

देशाच्या एकजूटीचे बळ कितीतरी प्रचंड असू शकते. हे अभूतपूर्वरीतीने दिसून आले आहे. सव्वाशे कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येचा हा देश अनेक राज्य, अनेक भाषा, धर्म, पंथ,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या व्हिडीओ

कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (१८-०२-२०१९)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (०६-०१-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२९-०१-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस...
Read More
post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More