कोरोनाबाधित मतदारांसाठी निवडणूक आयोगानं आणली नवी सुविधा – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोरोनाबाधित मतदारांसाठी निवडणूक आयोगानं आणली नवी सुविधा

मुंबई – कोरोनाबाधित रुग्णांना ग्रामपंचयात निवडणुकीत मतदान करता येणार का? हा प्रश्न सर्वांसमोर होता. राज्य निवडणूक आयोगाने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. कोरोनाबाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती; तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धातास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

मदान यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2020 रोजी तपशीलवार मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यात आता मतदानाच्यादृष्टीने अधिक स्पष्टता आणली आहे. गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुके वगळता सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली आणि गोंदियातील चार तालुक्यांमध्ये दुपारी 3.00 पर्यंत मतदानाची वेळ असेल. कोरोनाबाधित नसलेले, परंतु प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल. त्यांचे तापमान विहित निकाषांपेक्षा जास्त नसल्यास, अशा मतदारांना सर्वसाधारण मतदारांप्रमाणे सकाळी 7.30 पासून मतदान करता येईल.

मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाईज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात येईल. एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन दिले जाईल आणि त्यास मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलवण्यात येईल. सामाजिक अंतर राखण्याच्यादृष्टीने देखील दक्षता घेण्यात येईल. मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. यासह विविध मार्गदर्शक सूचनादेखील आधीच देण्यात आल्या आहेत, असेही मदान यांनी सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

सरपंच आणि सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी उमराणे व खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द

मुंबई – नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोरोनाबाधित मतदारांसाठी निवडणूक आयोगानं आणली नवी सुविधा

मुंबई – कोरोनाबाधित रुग्णांना ग्रामपंचयात निवडणुकीत मतदान करता येणार का? हा प्रश्न सर्वांसमोर होता. राज्य निवडणूक आयोगाने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. कोरोनाबाधित आणि विलगीकरण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

धनंजय मुंडे यांच्याविरोधात भाजप आक्रमक, निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

मुंबई – -सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. त्या तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका गायक तरुणीने बलात्काराचे आरोप केले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

…तर आम्ही जनतेला मोफत लस देऊ, दिल्लीकरांना केजरीवालांचा शब्द

नवी दिल्ली – भारतात १६ जानेवारीपासून आपत्कालीन वापरासाठी लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र, हे लसीकरण मोफत असणार की नाही याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही....
Read More