अवतारनंतर फेसबूककडून Rooms फीचर लॉन्च, वाचा याचे वैशिष्ट्य काय? – eNavakal
ट्रेंडिंग तंत्रज्ञान

अवतारनंतर फेसबूककडून Rooms फीचर लॉन्च, वाचा याचे वैशिष्ट्य काय?

भारत सरकारने ५९ चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर इतर अॅपकडून व्हिडिओ कॉलिंग तसेच इतर मनोरंजक गोष्टींचे अपडेट देण्यात आले. इन्स्टाग्रामने टीकटॉकच्या धर्तीवर Reels फिचर आणले होते. तर, आता फेसबूकने  Rooms हा नवा फिचर लॉन्च केला आहे.

हल्ली लॉकडाऊन काळात वेगळ्या क्षेत्रातील उद्योग जगतात, ऑनलाईन शाळा, कॉलेज, क्लासेस, कॉन्फरन्ससाठी व्हिडीओ मीटिंग केल्या जात आहे. यासाठी गुगल मीट, झूमसारखी अॅप्स आजवर नेटिझन्स वापरत होती आणि याच पार्श्वभूमीवर जिओने देखील व्हिडीओ कॉन्फरन्स अॅप सुरु करुन यात उडी घेतली, तर मग फेसबुक यात कसं मागे राहिल? त्यामुळे फेसबूकने  Rooms फीचर लॉन्च केलं आहे. यातून आपल्या फ्रेंड लिस्टमधील मंडळींसोबत मेसेंजर रुममध्ये तब्बल 50 व्यक्तींना घेऊन अनलिमिटेड व्हिडीओ कॉलिंग करता येत आहे.

झूम  अॅपला हे अॅप टक्क देत आहे. तर, दुसरीकडे टिक टॉक बंद झाल्यावर चिंगारीसारख्या अॅपकडे टिकटॉकर्स वळले होते. पण आता टिकटॉक सारखे व्हिडीओ करता येणार आहेत इन्स्टाग्रामवर. होय, इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये हे नवं फीचर आलंय!

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला २३ हजारांचा टप्पा, आज ३६८ नव्या रुग्णांची नोंद

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी २३ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज ३६८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून २३२ जणांना गेल्या २४...
Read More
post-image
मनोरंजन

करिना पुन्हा आई बनणार, गुड न्यूजच्या बातमीवर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

मुंबई – अभिनेत्री करीना कपूर पुन्हा आई बनणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. तसेच, या गुड न्यूज बाबत खुद्द सैफ आणि करिनाने सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, निलेश राणेंची मागणी

मुंबई – सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्यात आल्याने निलेश राणे आणखी सक्रीय झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदम्यान आदित्य...
Read More
post-image
मुंबई

मुंबई पालिकेच्या अभय योजनेची मुदत वाढवली

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईकरांना या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कोरोना चाचणीचे दर आणखी कमी केले, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई -राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या...
Read More