आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क – eNavakal
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क देखील तयार केलेले आपण सोशल मीडियावर पहिलं असेल. मात्र असं असलं तरी मास्कमुळे चेहरा झाकला जातो आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीला ओळखणं जरा कठीणच होतं. पंरतु आता आपल्याच चेहऱ्याचे प्रिंट असेलेले मास्क  तयार केले जात आहेत.

स्वतःच्या चेहऱ्याचे प्रिंट असणारे मास्क तयार करण्याची अनोखी कल्पना केरळमधील एका व्यक्तीला सुचली आहे. कोट्टायम येथील एट्टूमानूर येथे राहणारा बिनेश जी पॉल (३८ वय) या डिजिटल फोटोग्राफरला ही कल्पना सुचली आहे.

सर्वात आधी संबंधित व्यक्तीचे छायाचित्र काढले जाते. तर मास्क लावल्यावर चेहऱ्याचा जो भाग झाकला जातो त्याची प्रिंट काढून ती मास्कवर लावली जाते.  त्यामुळे मास्क लावणाऱ्या व्यक्तीचा चेहरा ओळखता येतो.

मास्क घातल्यावर लोकांना ओळखण्यास अनेकदा अडथळे येतात. त्यामुळे हा अडथळा दूर करण्यासाठी अशा मास्कचा उपयोग होत असल्याचं बिनेश म्हणाला. विशेष म्हणजे हा मास्क तयार करण्यासाठी फक्त २० मिनिटं लागत असून त्याची किंमत ६० रुपये इतकी आहे.

केरळमध्ये सध्या या मास्कला मोठी मागणी असून लोकांची याला पसंती मिळत आहे. त्यामुळे असे मास्क परिधान करून तुम्ही सहज एकमेकांना ओळखू शकता.

सध्या जगभरात कोरोनाचं संक्रमण वाढत असून मास्कचा वापर देखील वाढत आहे. अशातच अनेक ठिकाणी वेगवगेळ्या मास्कची निर्मिती केलेली पाहायला मिळत आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये प्राप्त

मुंबई – राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत निधी काल प्राप्त झाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती – कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या विविध अडचणींचा सामना करत शासन- प्रशासनाने विविध सुविधा व योजनांना चालना दिली. प्रभावी उपचारयंत्रणेसाठी प्रयोगशाळा, प्लाझ्मा सुविधा, कोविड...
Read More
post-image
देश

चीनचा डोळा आता हिंद महासागरावर,पाकिस्तानच्या बंदरात खलबतं सुरू

मुंबई -चीन भारतविरोधी सतत कारवाया करत असून आता चीनचा हिंद महासागरावरही डोळा आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल...
Read More
post-image
Uncategoriz देश शिक्षण

स्कूल फ्रॉम होममुळे ७२.८% विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम, सर्वेक्षण

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्कूल फ्रॉम होम सुरू झाले आहे. मात्र या नव्या पद्धतीचं शिक्षण घेताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना कसरत करावी लागत...
Read More
post-image
देश

‘या’ आयटी कंपनीत ५०० कर्मचारी कपात, भारतीय परदेशातून परतणार

नवी दिल्ली -भारतातील अनेक तंत्रकुशल नागरिक इंग्लड, अमेरिकेसारख्या देशात नोकरीसाठी वात्सव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारण, का आघाडीच्या आयटी...
Read More