बंगळूरूतील सायन्स लॅबमध्ये अपघाती स्फोट; एकाचा मृत्यू – eNavakal
अपघात आघाडीच्या बातम्या देश

बंगळूरूतील सायन्स लॅबमध्ये अपघाती स्फोट; एकाचा मृत्यू

बंगळुरू – बंगळुरूस्थित भारतीय विज्ञान संस्थेच्या (आयआयएस) एरोस्पेस प्रयोगशाळेत आज एका हायड्रोजन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. दुपारी 2 वाजू 20 मिनिटांनी हा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की यात एका वैज्ञानिकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनोज कुमार असे मृत झालेल्या वैज्ञानिकाचे नाव आहे. तर कार्तिक शेनॉय, अतुल्य कुमार आणि नरेश कुमार अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेनंतर बंगळुरू पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र

टोमॅटोच्या भावात मोठी घसरण; २० किलोच्या कॅरेटला १०० रुपये

मनमाड – खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून असणारे टोमॅटो पीक शेतकर्‍याची चिंता वाढवू लागली आहे. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. घाऊक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More