लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा – eNavakal
दहशतवादी हल्ला देश संरक्षण

लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा

श्रीनगर – बारामुल्लातील क्रिरी भागात आज सकाळी गस्तीवर असलेल्या सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक विशेष पोलीस अधिकारी शहीद झाले. काही तासातच सुरक्षा दलांनी लष्कर ए तोयबाच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांना चकमकीत ठार केलं. काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांत दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर केलेला हा दुसरा हल्ला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य केले जात आहे. आज सकाळी बारामुल्लातील क्रिरी भागात जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ जवानांचे पथक संयुक्त गस्तीवर निघाले असताना दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्याला परतवून लावण्यास जम्मू-काश्मीर पोलीस व सीआरपीएफच्या जवानांना यश आले. या हल्ल्यात दोन जवानांसह एक विशेष पोलीस अधिकारी जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. गोळीबार करणारे दहशतवादी क्रिरी भागातच लपून बसले असल्याची माहिती सीआरपीएफच्या जवानांना मिळाली. त्यानंतर जवानांकडून संपूर्ण परिसराला घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते.

दरम्यान, याआधी स्वातंत्र्य दिनासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीस दलावर 14 ऑगस्ट रोजी श्रीनगरनजिक नौगाम बायपासजवळ दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यातही दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
दहशतवादी हल्ला देश संरक्षण

लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा

श्रीनगर – बारामुल्लातील क्रिरी भागात आज सकाळी गस्तीवर असलेल्या सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारात...
Read More
post-image
देश

सरकारमुळे क्रिकेटच्या मैदानावरचं वातावरण भयंकर असेल, इम्रान खानची मोदी सरकारवर टीका

कराची – येत्या काळात भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार का याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यावर आज पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ज्यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

राहुल गांधी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई – फेसबुक आणि व्हाट्स अँप भाजपच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...
Read More
post-image
ट्रेंडिंग मनोरंजन

मध्यमवर्गीय कुटुंबातील निशिकांत कामत यांची मराठी, तामिळ, हिंदी सिनेसृष्टीत दमदार कामगिरी

मुंबई – प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. वयाच्या ५० वर्षीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांनी त्यांच्या संपूर्ण हयातीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यातून आज दिलासादायक आकडेवारी, बरे झालेल्या रुग्णांचीही संख्या अधिक

मुंब –  राज्यात आज कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८४९३ नवीन रुग्णांचे...
Read More