#Elections2019 लोकसभेच्या ६ व्या टप्प्यासाठी ६३.०३ टक्के मतदान; उत्तर प्रदेश, दिल्‍लीत कमी प्रतिसाद  – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

#Elections2019 लोकसभेच्या ६ व्या टप्प्यासाठी ६३.०३ टक्के मतदान; उत्तर प्रदेश, दिल्‍लीत कमी प्रतिसाद 

नवी दिल्ली – दिल्‍लीतील सात मतदारसंघांसह हरियाणा, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, म.प्रदेशमधील 59 मतदारसंघांत लोकसभेच्या सहाव्या टप्पासाठी आज मतदान पार पडले. यामध्ये उत्तर प्रदेश आणि दिल्‍लीत कमी मतदानाची नोंद झाली. तर सर्वाधिक मतदान पश्‍चिम बंगालमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले. तर सहाव्या टप्प्यासाठी देशभरात 63.03 टक्के मतदान झाले. आज सकाळी अनेक राजकीय आणि खेळाडूंनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि पश्‍चिम बंगाल वगळता इतर राज्यात मतदान शांततेत पार पडले.

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी सुद्धा दिल्‍लीच्या सरदार पटेल विद्यालयातील मतदान केंद्रात मतदान केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, ही निवडणूक खरोखरच अतिशय महत्वाची निवडणूक आहे. कारण आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत. तर युपीएच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी निर्माण भवन येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. तर भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भोपाळमधील हनुमान दर्शन येथील मतदारकेंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे पुर्व दिल्ली मतदार संघातील उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी पत्नीसह दिल्‍लीतील जुन्या राजिंदर नगरमधील मतदान केंद्रात आपले मतदान केले. तर सकाळी गुरूग्राममधील पाइनक्रिस्ट स्कूलमध्ये मतदान केंद्रात भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने देखील मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी विराटने इतरांना देखील मतदान करण्याचे आव्हान केले. तसेच राष्ट्रपती भवन येथे तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मतदान केले. औरंगजेब लेन मतदान केंद्रावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीं यांनी मतदानाचा अधिकार बजावला. हरियाणाच्या सोनिपत येथील काँग्रेस उमेदवार भूपिंदर सिंग हु्ड्डा आणि रोहतक येथील काँग्रेस उमेदवार दीपेंदर सिंह हुड्डा यांनी सहपरिवार मतदान केले. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीनी दिल्‍लीतील एनआयपी प्रिमिअर स्कूलमधील मतदान केंद्रावर मतदानचा अधिकार बजाबला. दरम्यान, पश्चिम बंगालमधील झारग्राम येथे मतदान सुरू होण्यापूर्वी भाजपच्या एका बूथ कार्यकर्त्याचा मृतदेह मिळाला.

मृत व्यक्तीचे नाव रामेन सिंह असे आहे. तसेच पूर्व मोदिनीपूर येथील भगवारपूरमध्ये काल रात्री दोन भाजप कार्यकर्त्यांवर गोळीबार झाल्याची घटना घडली. दोघांवर उपचार सुरू आहेत. झारग्राम येथील कार्यकर्त्याच्या हत्येमागे तृणमूलचा हात असल्याचा आरोप भाजपने केला. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार रामेन सिंह अगोदरपासूनच आजारी होता. त्याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आला आह

बिहारमध्ये मतदानादरम्यान गोंधळ

बिहारमधील शिवहर येथील मतदानकेंद्रावर होमगार्ड जवानाकडून चुकीने गोळी झाडली गेली. यामुळे बूथवरील एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे मध्यप्रदेशच्या भिंडमधील जैतपुरागुडा गावात बूथ कॅप्चरिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांना मारहाण करण्याचा आरोप आहे. यादरम्यान मतदान केंद्रावर गोंधळ माजला होता. सध्या येथील मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.

गुरुग्राममध्ये किरकोळ वादातून भाजप-काँग्रेसमध्ये राडा
गुरुग्राममधील फिरोजपूर येथील चांदडाका गावात मतदान केंद्रावर किरकोळ वादातून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यामध्ये काँग्रेसच्या दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून या दोन्ही कार्यकर्त्यांना काँग्रेसचे नेते कॅप्टन यादव यांनी आपल्या गाडीतून रुग्णालयात पोहोचले.

अपडेट


सकाळी ३ वाजेपर्यंत राज्यनिहाय झालेले मतदान

बिहार- ४३.८६ टक्के, हरियाणा – ४७.५७ टक्के, मध्य प्रदेश – ४८.५३ टक्के, उत्तर प्रदेश – ४०.९६ टक्के, पश्चिम बंगाल – ६३.०९ टक्के, झारखंड – ५४.०९ टक्के, नवी दिल्ली – ३६.७३ टक्के.


माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिल्लीतील कामराज लेन येथील मतदान केंद्रात बजावला मतदानाचा हक्क


दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून बोगस मतदानाचा प्रयत्न झाल्याचा आप उमेदवाराचा आरोप


सकाळी १ वाजेपर्यंत राज्यनिहाय झालेले मतदान
बिहार- 35.22 टक्के, हरियाणा – 38.69 टक्के, मध्य प्रदेश – 42.14 टक्के, उत्तर प्रदेश – 34.30 टक्के, पश्चिम बंगाल- 55.58 टक्के, झारखंड – 47.16 टक्के, नवी दिल्ली 32.98 टक्के.

नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत आणि मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बजावला मतदानाचा हक्क


१११ वर्षीय बचन सिंह यांनी दिल्लीत बजावला मतदानाचा हक्क


सकाळी १२ वाजेपर्यंत राज्यनिहाय झालेले मतदान
बिहार – २०.७० टक्के, हरियाणा – २३.२६ टक्के, मध्यप्रदेश – 28.01 टक्के, उत्तरप्रदेश – 21.75 टक्के, प.बंगाल – 38.08 टक्के, झारखंड -31.37 टक्के, दिल्ली – १९.५५ टक्के.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी लोढी इस्टेट इथे बजावला मतदानाचा हक्क


पश्चिम बंगालमधील बंकुरा येथे भाजपा आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी


सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यनिहाय झालेले मतदान

बिहार – 11.19 टक्के, हरियाणा – 12.10 टक्के, मध्य प्रदेश – 18 टक्के, उत्तर प्रदेश – 16 टक्के, पश्चिम बंगाल – 23 टक्के, झारखंड -28 टक्के, दिल्ली 8.60 टक्के.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बजावला मतदानाचा अधिकार, द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात आणि दिल्लीतील काम रोखणाऱ्यांविरूद्ध मतदान करण्याचं आवाहन


सोनिया गांधी यांनी नवी दिल्लीतील निर्माण भवन येथे बजावला मतदानाचा हक्क


पश्चिम बंगाल – भाजप उमेदवार भारती घोष यांच्या कारवर हल्ला; तृणमूल काँग्रेसने हल्ला केला असल्याचा भाजपचा आरोप


सकाळी १० वाजेपर्यंत राज्यनिहाय झालेले मतदान
दिल्ली – 7.97 टक्के, पश्चिम बंगाल – 17.08 टक्के, झारखंड – 15.36 टक्के, बिहार – 9.03 टक्के, हरियाणा – 9.27 टक्के, मध्य प्रदेश – 13.22 टक्के, उत्तर प्रदेश – 9.37 टक्के.

झारखंड – महाराजगंज येथे मतदान केंद्रावर गोळीबार, दोन जखमी


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बजावला मताधिकार


सकाळी 9 वाजेपर्यंत राज्यनिहाय झालेले मतदान

बिहार – 9.03 टक्के, हरियाणा – 4.20 टक्के, मध्य प्रदेश – 4.33 टक्के, उत्तर प्रदेश – 7.17 टक्के, पश्चिम बंगाल – 7.86 टक्के, झारखंड -13.22 टक्के, दिल्ली 4.00 टक्के


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवन येथे बजावला मताधिकार


सुलतानपूर मतदान केंद्रावर मनेका गांधींचा वाद


मध्य प्रदेश – भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावला


नवी दिल्ली -भाजप उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने आपला मतदानाचा हक्क बजावला


नवी दिल्ली -टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गुरुग्राम येथील शाळेत सकाळीच मतदानाच्या रांगेत उभा होता


लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More