#Elections2019 ‘ती’ होती म्हणून मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान? – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

#Elections2019 ‘ती’ होती म्हणून मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान?

मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. मात्र या आधीच्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावर काम करणार्‍या एका रुपवान महिलेचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ही महिला निवडणूक अधिकारी नेमकी कोण आहे, याबाबतची चर्चा थांबता थांबेना. या महिलेची नेमकी ओळख काही दिवसांनी समोर येईल. मात्र ही महिला ज्या मतदान केंद्रावर काम करीत होती त्याठिकाणी 100 टक्के मतदान झाल्याचा दावा अनेकांनी केला आहे.

काहीजणांनी ही महिला नलिनी सिंह तर काहींनी रिना द्विवेदी असल्याचे म्हटले आहे. लिंबू कलरच्या साडीमधील ही सरकारी अधिकारी महिला लखनऊच्या पीडब्ल्यूडीमध्ये कार्यरत आहेत. तिला शहरातील नगराम भागातील 173 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर निवडणूक ड्युटी लावण्यात आली होती, असे सांगितले जात आहे. तर काहींनी ही महिला म्हणजे ‘मिसेस जयपूर’ नलिनी सिंह असल्याचे म्हटले आहे. नलिनी सिंह समाजकल्याण विभागात कार्यरत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

होर्डिंग लावल्याने कोणाला तिकीट मिळत नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर बेकायदा होर्डिंग लावण्याचा सपाटा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या होर्डिंगमुळे...
Read More