आचारसंहितेचं उल्लंघन, मोदींविरोधात तृणमूल काँग्रेसची तक्रार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

आचारसंहितेचं उल्लंघन, मोदींविरोधात तृणमूल काँग्रेसची तक्रार

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतरच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ दौऱ्याचं टीव्हीवर प्रक्षेपण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे सांगत तृणमूल काँग्रेसने मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तृणमूलने आयोगाला चिठ्ठी लिहून मोदींवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी केदारनाथ यात्रेला गेले आहेत. यांनी केदारनाथला रुद्राभिषेक करत गुहेत ध्यानधारणा केली. केदारनाथपाठोपाठ बद्रीनाथाच्या चरणीही पंतप्रधानांनी डोके टेकले. त्यांच्या या यात्रेला प्रसारमाध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत आहे. यावेळी मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत केदारनाथ परिसरात सुरू असलेल्या विकासकार्यांचाही आढावा घेतला. हे आचारसंहितेचं मोठं उल्लंघन आहे, त्यामुळे यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तृणमूलने या चिठ्ठीतून केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

एमआयएमकडून मुंबईतील ५ उमेदवारांची यादी जाहीर

औरंगाबाद – एमआयएम पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएम ‘वंचित’ आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा होती. मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More