पर्यावरणपूरक रक्षाबंधन! नारळाच्या करवंट्यापासून बनवल्या राख्या, जमिनीत पुरल्यास रोपटं उगवणार – eNavakal
ट्रेंडिंग तंत्रज्ञान

पर्यावरणपूरक रक्षाबंधन! नारळाच्या करवंट्यापासून बनवल्या राख्या, जमिनीत पुरल्यास रोपटं उगवणार

रक्षाबंधन सण काही दिवसांतच येऊन ठेपला आहे. मात्र यंदा रक्षाबंधनावर कोरोनाचं सावट असल्याने बाजारात राख्यांची विक्री अद्यापही मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली नाही. परंतु, अनेकांकडून सध्या ऑनलाईन राखी विक्री केली जात आहे. यातच, सिंधुदुर्गातील प्राध्यापक हसन खान यांनी एक नवी संकल्पना प्रत्यक्षात रुजवली आहे. या संकल्पनेमुळे निसर्ग संवर्धन तर होईलच शिवाय निसर्ग वाढण्यासही मदत होणार आहे. प्राध्यापक हसन खान आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळून नारळाच्या करवंट्यापासून राख्या बनवल्या असून या राख्यांना सध्या तुफान प्रतिसाद मिळतो आहे. चला, तर त्यांच्या या संकल्पनेविषयी जाणून घेऊया.

नारळाच्या करवंट्याची कल्पना कशी सुचली?

सिंधुदुर्गाच्या स. का. पाटील महाविद्यालयात प्राध्यापक असलेले हसन खान हे निसर्ग संवर्धनाच्या प्रकल्पातही काम करतात. त्यामुळे निसर्गाप्रती त्यांना खूप चांगली जाण आहे. आपले सणवार केवळ प्रथा म्हणून साजरे न होता उत्सव म्हणून साजरे झाले पाहिजे, असं त्यांना वाटतं. राखीपौर्णिमा हा सण प्रत्येक धर्मामध्ये साजरा केला जातो. मात्र असे उत्सव साजरे करताना निसर्गभानही जपलं पाहिजे, असं हसन खान यांना वाटतं. राखी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमाही म्हणतात. यादिवशी निसर्गपूजा केली जाते. मात्र दुसऱ्यादिवशी त्याच झाडाखाली कचरा निर्माण होतो. उत्सवांतून सामाजिक संदेश पोहोचणं गरजेचं आहे, त्यातून निसर्गपूजा झाली पाहिजे, या हेतुने त्यांनी विचार केला की राख्याही पर्यावरणपूरक बनवल्या तर? सिंधुदुर्गात नारळाची झाडं भरपूर आहेत. त्यातून अनेक गोष्टीही तयार केल्या जातात. हसन खान यांनीही स्वत: टाकाऊपासून अनेक टिकाऊ वस्तू बनवल्या आहेत. त्यांच्यातील हीच चिकित्सक बुद्धी त्यांना स्वस्थ बसू देईनात. म्हणून त्यांनी नारळाच्या करवंट्यापासूनच राख्या बनवण्याचा विचार केला. हा विचार त्यांनी प्रत्यक्षात आणला आणि आता या संकल्पनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

या राखीचं वैशिष्ट्य काय?

बाजारात मिळणाऱ्या राख्यांमध्ये प्लास्टिक वस्तूंचा वापर केलेला असतो. तसेच, आकर्षक राख्यांसाठी अनेक निसर्गविघातक वस्तूंचा वापर केलेला असतो. त्यामुळे निसर्गाला हानिकारक ठरतील असे उत्सव साजरे करण्यापेक्षा निसर्गरक्षण होईल अशा पद्धतीने उत्सव साजरे करता यावेत याकरता हसन खान यांनी करवंट्यापासून राख्या बनवल्या. महत्त्वाचं म्हणजे या राख्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बिया टाकण्यात आल्या आहेत. जेणेकरून  पावसाळ्यात राखी पौर्णिमा झाल्यावर राखी मातीत टाकल्यास त्यातून रोप उगवून येईल. तसेच, राख्यांवर समुद्र, वारली पेंटिंग, जैवविविधता, मालवणी संदेश याद्वारे निसर्ग व आपली संस्कृतीची झलक दाखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या राख्यांना प्रतिसाद कसा आहे?

३ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. मात्र आतापासून या राख्यांना प्रचंड मागणी असल्याचं हसन खान यांनी सांगितलं. नागपूर, यवतमाळ, नाशिक, सांगली, सातारा, मुंबई, कल्याण, डोंबिवली आदी ठिकाणी राख्या पोहोचवण्यात आल्या आहेत. सध्या ट्रॅव्हल्स सेवा सुरू झाल्याने ट्रॅव्हल्समार्फत राख्या पोहोचवल्या जातात, तर पोस्ट आणि कुरिअरचाही वापर करून राख्या पोहोचवल्या जात आहेत.

हसन खान काय म्हणतात?

निसर्गाने आपल्याला भरभरून दिलं आहे. त्यामुळे निसर्गाचं ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. मात्र निसर्ग वाचवणं आपलं कर्तव्य आहे. निसर्ग वाचवण्यासाठी आंदोलने, मोर्चे काढण्यापेक्षा आपण आपल्या राहणीमानात बदल केला तरी खूप मोठा बदल घडू शकतो. आपण नियमित वापरत असलेल्या गोष्टींना निसर्गात पर्याय आहेत. त्यामुळे प्लास्टिक किंवा तत्सम प्रकारच्या वस्तू टाळून आपण पूर्णत: शाश्वत झालो तर निसर्ग आपल्याला आणखी भरभरून देईल.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं: राऊत

मुंबई – शरद पवार यांनी एखादं वक्तव्य केलं असेल तर त्यावर मीडियाने फार चिंता करण्याची गरज नाही. पवार जे विधान करतात ते निरर्थक नसतं हे त्यांना...
Read More
post-image
क्रीडा

आयपीएलपूर्वीच खेळाडूला कोरोनाची लागण

नवी दिल्ली – अभिनेते, राजकारण यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता क्रिकेटपटूंनाही कोरोनाची लागण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे आयपीएलपूर्वीच एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याने चिंता...
Read More
post-image
महाराष्ट्र वाहतूक

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ

मुंबई – गणेशोत्सवासाठी दरवर्षी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा हा प्रवास सुरळीत होण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आता...
Read More
post-image
देश

सुशांत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव कोणीही घेतलेलं नाही, संजय राऊत यांचा खुलासा

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्यात येत आहे. मात्र, आदित्यचं नाव कोणीही घेतलेलं नाही,...
Read More
post-image
कोरोना देश

प्रणव मुखर्जी अद्याप व्हेंटिलेटरवरच; अफवांमुळे पुत्र-कन्या नाराज

नवी दिल्ली – भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर दिल्लीतील आर्मी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना अद्याप व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले आहे. मात्र समाज माध्यमातून त्यांचे...
Read More