मोदींचा बायोपिक वादात, निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस – eNavakal
आघाडीच्या बातम्या निवडणूक राजकीय

मोदींचा बायोपिक वादात, निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित असलेला बहुचर्चित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट अडचणीत आला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रार्श्वभूमीवर देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. पीएम नरेंद्र मोदी चित्रपट निवडणूक आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करतो, अशी नोटीस दिल्लीच्‍या मुख्य निवडणूक कार्यालयाने बायोपिकच्‍या निर्मात्‍यांना पाठवली आहे

आगामी लोकसभा निवडणुकांचे पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिल रोजी होणार आहे. देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी चित्रपट निवडणूक आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करत असल्याची नोटीस दिल्लीच्‍या मुख्य निवडणूक कार्यालयाने बायोपिकच्‍या निर्मात्‍यांना पाठवली आहे. बायोपिकच्‍या निर्मात्‍यांना उत्तर देण्यासाठी ३० मार्चपर्यंत वेळ देण्‍यात आली आहे.

चित्रपट राजकीय व्यक्तीच्या जीवनावर आधारीत असून जनमतावर प्रभाव टाकण्यासाठीची ही भाजपची रणनीती असल्याचा आरोप विरोधकांनी केला. निवडणूका पार पडेपर्यंत चित्रपट प्रदर्शन थांबवण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. मात्र बायोपिक हे निवडणूक आयोगाच्या कक्षेत येत नसल्याची माहिती अॅड गुरु दिलीप चेरिअन यांनी दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला...
Read More
post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More
post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More