पाकमध्ये दुष्काळ? भारताचा मास्टर प्लॅन – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

पाकमध्ये दुष्काळ? भारताचा मास्टर प्लॅन

दिल्ली – भारताच्या केंद्र सरकराने रावी नदीवर धरण बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याने रावी नदी मार्फत पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी आडण्यात येणार आहे. सध्या पंजाबमध्ये उगम पावणाऱ्या आणि बियास, सतलज, जम्मू काश्मीरहून पाकिस्तानच्या हद्दीत जाणाऱ्या रावी नदीचे पाणी कोणताही वापर न करता वायफळ वाहून जात असल्याने यावर धरण बांधून पाण्याचा वापर करता येईल असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता, अखेर या प्रस्तावाला मंजूरी दिल्याने रावी नदीवर शाहपूरकांदी धरण बांधण्यात येईल. तसेच रावी नदीचे पाणी आडवल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या पाकिस्तानमधील काही राज्यांमध्ये पाण्याची टंचाई भासणार असल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला.

येत्या 2022 साली हा प्रकल्प पुर्ण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे तसेच त्यामुळे पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल, असेही म्हटले जात आहे. 1960 साली झालेल्या करारानुसार रावी नदीचे संपूर्ण पाणी भारताला वापरण्याचा अधिकार आहे, त्यामुळे या नदीवर धरण बांधून पंजाब राज्याची 5 हजार हेक्टर तर जम्मू आणि काश्मीर या राज्यांची 32 हजार 173 हेक्टरने सिंचन क्षमता वाढू शकते, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसेच या प्रकल्पामुळे 206 मेगावॅट ऊर्जाक्षमतेचा हायड्रोपावर प्रकल्पही उभारता येणार असल्याची माहिती, सूत्रांनी वर्तवली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत. दरवर्षी शेकडो भारतीय भाविक शंकराच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज दुपारी ३ वाजता मराठा आरक्षणाचा निकाल

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालय आज गुरुवारी दुपारी 3 वाजता आपला निर्णय...
Read More