९० दिवसांत टिकटॉकच्या संपत्तीची विक्री करण्याचा डोनाल्ड ट्रम्पचा आदेश – eNavakal
विदेश

९० दिवसांत टिकटॉकच्या संपत्तीची विक्री करण्याचा डोनाल्ड ट्रम्पचा आदेश

न्यूयॉर्क – काही दिवसांपूर्वी अमेरिकेने सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घातली होती. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनी बाईटडान्सला ९० दिवसांत अमेरिकेतील टिकटॉकची संपत्ती विकण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपन्यांविरोधात आपली कठोर भूमिका अद्याप कायम ठेवल्याचे स्पष्ट होत आहे.

वाचा – ‘माकडांनाही लस देणार नाही,’ रशियाने शोधलेल्या लसीची अमेरिकेने उडविली खिल्ली

चिनी कंपनी बाईटडान्स असे काही काम करू शकते ज्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे, असे ट्रम्प यांनी यावेळी नमूद केले. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. तसेच अर्थव्यवस्था. परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला हे अॅप धोकादायक असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

वाचा – स्पेक्ट्रम प्रकरणी जिओ आणि आरकॉमला सुप्रीम कोर्टाची नोटीस

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी भारताने सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकसह आणखी काही चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर अन्य काही देशांमधूनही तसाच सूर उमटू लागला होता. अमेरिकेनेही सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

९० दिवसांत टिकटॉकच्या संपत्तीची विक्री करण्याचा डोनाल्ड ट्रम्पचा आदेश

न्यूयॉर्क – काही दिवसांपूर्वी अमेरिकेने सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घातली होती. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनी बाईटडान्सला ९० दिवसांत अमेरिकेतील टिकटॉकची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

अभिमानास्पद! कॅप्टन अमोल यादव यांनी बनविले भारतीय बनावटीचे पहिले विमान

मुंबई – आज भारताच्या स्वातंत्र्य दिनी मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून यावी अशी ऐतिहासिक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप येथे राहणारे कॅप्टन अमोल शिवाजी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचं एक आदर्श कुटुंब, पार्थ पवारांविषयीचा प्रश्न एका मिनिटांत सोडवतील-राजेश टोपे

जालना – ‘पार्थ पवार अपरिपक्व आहेत, त्यांच्या शब्दाला कवडीची किंमत देत नाही, असं शरद पवार यांनी म्हटल्यानंतर राष्ट्रवादीत अंतर्गत वाद असल्याचं बोललं जात आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सरकार चीन आणि पाकिस्तानचं नाव घ्यायला का घाबरतंय? आजच्या भाषणानंतर कॉंग्रेसचा सवाल

नवी दिल्ली – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. मात्र,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

एअर इंडियाने ४८ वैमानिकांना केलं तडकाफडकी बडतर्फ

नवी दिल्ली -लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या असताना आता एअर इंडियानेही आपल्या ४८ वैमानिकांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या वैमानिकांनी गेल्या वर्षी आपला राजीनामा कंपनीकडे...
Read More