मुंबई – कुख्यात डॉन अरुण गवळी आजोबा होणार आहे. अरुण गवळीचा जावई आणि अभिनेता अक्षय वाघमारेने इन्स्टाग्रामवरुन गुड न्यूज शेअर केली. अक्षयची पत्नी योगिता गवळी-वाघमारे हिचं डोहाळ जेवण झालं.
अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी लॉकडाऊनमध्ये विवाहबंधनात अडकले. 8 मे रोजी मुंबईत अक्षय-योगिता यांचा विवाह सोहळा झाला. लॉकडाऊनचे नियम पाळून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला.
View this post on Instagram
अक्षय आणि योगिता यांचं लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच झालं. फक्त गवळी आणि वाघमारे कुटुंबातील सदस्यांनाच लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी होती. अरुण गवळी पॅरोलवर असतानाच लॉकडाऊनच्या काळात त्याच्या मुलीचा विवाहसोहळा देखील संपन्न झाला. कन्यादान करताना अरुण गवळी भावूक झाल्याचंही दिसलं होतं.