…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक बाजू सांभाळण्यास सक्षम आहोत. त्यांना कर्ज काढण्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी कंपनी खोलली पाहिजे, अशी जोरदार टीका राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांवर केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला कर्ज काढण्याचा सल्ला दिला. या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला आहे.

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते पत्रकार परिषदेत सांगत होते. केंद्राने महाराष्ट्राला २८ हजार कोटी रुपये दिले. विविध योजनांसाठी पैसा द्यावा लागतो. ते बंधनकारक असते. ते दिलेले पैसे नवीन योजनेसाठी खर्च करत नाही. पॅकेज दिले हे चुकीचे आहे. त्याचा फायदा राज्यसरकारला झालेला नाही. बंधनकारक पैसे सरकारला आणि जनतेला दिले आहेत. महाराष्ट्राने दीड लाख कोटीचे कर्ज काढले पाहिजे असा सल्ला देवेंद्र फडणवीस देत आहेत. लोकं जगात, देशात, महाराष्ट्रात कर्ज काढण्यासाठी उत्सुक आहेत. तो त्यांचा उद्योग चांगल्या पद्धतीने चालेल असा टोलाही नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

आम्ही महाराष्ट्राचे सरकार अस्थिर करणार नाही असे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. परंतु महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होवू शकत नाही. तिन्ही पक्ष भक्कमपणे सरकार चालवत आहेत. हे पण खरे आहे की, दिल्लीपासून महाराष्ट्रातील भाजपाचे लोक हे सरकार पडणार आहे. आम्ही सरकार बनवणार आहोत. राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. परंतु हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. एकजुटीने आम्ही काम करतोय. भाजपाने कितीही अफवा पसरवल्या तरी सरकार स्थिर राहणार आहे असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये प्राप्त

मुंबई – राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत निधी काल प्राप्त झाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती – कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या विविध अडचणींचा सामना करत शासन- प्रशासनाने विविध सुविधा व योजनांना चालना दिली. प्रभावी उपचारयंत्रणेसाठी प्रयोगशाळा, प्लाझ्मा सुविधा, कोविड...
Read More
post-image
देश

चीनचा डोळा आता हिंद महासागरावर,पाकिस्तानच्या बंदरात खलबतं सुरू

मुंबई -चीन भारतविरोधी सतत कारवाया करत असून आता चीनचा हिंद महासागरावरही डोळा आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल...
Read More
post-image
Uncategoriz देश शिक्षण

स्कूल फ्रॉम होममुळे ७२.८% विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम, सर्वेक्षण

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्कूल फ्रॉम होम सुरू झाले आहे. मात्र या नव्या पद्धतीचं शिक्षण घेताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना कसरत करावी लागत...
Read More
post-image
देश

‘या’ आयटी कंपनीत ५०० कर्मचारी कपात, भारतीय परदेशातून परतणार

नवी दिल्ली -भारतातील अनेक तंत्रकुशल नागरिक इंग्लड, अमेरिकेसारख्या देशात नोकरीसाठी वात्सव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारण, का आघाडीच्या आयटी...
Read More