मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत – eNavakal
मनोरंजन

मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत

मुंबई – ‘प्यार का पंचनामा’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटांसोबत ‘मिर्झापुर’, ‘बिच्छू का खेल’ या वेबसिरीजमध्ये झळकलेल्या दिव्यांदू शर्माने आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. अल्पावधीतच आपल्या अभिनयाची छाप उमटवून हटके भूमिका साकारणारा हा अभिनेता कार्निवल मोशन पिक्चर्सच्या आगामी ‘मेरे देश की धरती’ या हिंदी चित्रपटातही एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मॉर्डन लुक व हातात कुदळ असलेला या चित्रपटातील त्याचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. वैशाली सरवणकर यांची निर्मिती असलेला ‘मेरे देश की धरती’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

दोन इंजिनिअर्स तरुण स्वत:ची नोकरी करत असताना, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची उर्मी जपण्यासाठी कसे शेतकरी बनतात, ह्याची हलकी फुलकी रंजक कथा ‘मेरे देश की धरती… देश बदल रहा है’ या चित्रपटातून उलगडणार आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना दिव्यांदू सांगतो कि, ‘मला खूप अभिमान वाटतो की, मी शेतकऱ्याच्या एका वेगळ्या भूमिकेत काम करू शकलो. आज आपल्या देशात असंख्य शेतकरी खडतर मेहनत करून सुद्धा पोटभर जेऊ शकत नाहीत. हे चित्र नव्या विचारांनी बदलले जाऊ शकते त्यासाठी तरुण नेतृत्वाने पुढे येऊन काहीतरी करण्याची गरज आहे, हा संदेश देणारा हा चित्रपट आणि तशा धाटणीची माझी भूमिका रसिकांना नक्की आवडेल असा विश्वास दिव्यांदू शर्मा व्यक्त करतो. दिव्यांदू शर्मा सोबत या चित्रपटात अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका या आघाडीच्या कलाकारांसोबत ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर या प्रतिभावान कलाकारांच्यासुद्धा भूमिका आहेत.

‘मेरे देश की धरती’ या चित्रपटाची संकल्पना डॉ. श्रीकांत बासी यांची आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. संवाद पियुष मिश्रा यांनी लिहिले आहेत. चित्रपटाला साजेसं संगीत विक्रम मॉण्टेरोज यांनी दिले असून छायांकन हरी वेदांतम यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन पवन आणि बॉब यांचे आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई – कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. “मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल...
Read More
post-image
मनोरंजन

मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत

मुंबई – ‘प्यार का पंचनामा’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटांसोबत ‘मिर्झापुर’, ‘बिच्छू का खेल’ या वेबसिरीजमध्ये झळकलेल्या दिव्यांदू शर्माने आपल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लैंगिक अत्याचारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली – शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नसेल तर तो लैंगिक अत्याचार ठरू शकत नाही. अल्पवयीन मुलीच्या खासगी भागाला स्पर्श केला, तरच पोक्सो...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन देश राजकीय

कृषीविरोधी कायदे मागे घ्या! राहुल गांधींचे ट्विट

नवी दिल्ली – मंगळवारी देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान उफाळलेल्या हिंसाचाराने संपूर्ण दिल्ली हादरली. यानंतर आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल...
Read More
post-image
देश

दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी लक्खा सिधानाचेही नाव समोर

नवी दिल्ली – काल देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान उफाळलेल्या हिंसाचाराने संपूर्ण दिल्ली हादरली. या हिंसाचारात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान...
Read More