Dil bechara चित्रपटाने तोडले सर्व रेकॉर्ड्स, समिक्षक-चाहत्यांकडूनही भरभरून कौतुक – eNavakal
ट्रेंडिंग मनोरंजन

Dil bechara चित्रपटाने तोडले सर्व रेकॉर्ड्स, समिक्षक-चाहत्यांकडूनही भरभरून कौतुक

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा अखेरचा बहुचर्चित चित्रपट दिल बेचारा अखेर काल २४ जुलै रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याच्या अनेक चाहत्यांनी फर्स्ट शोलाच हजेरी लावली. मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी हा चित्रपट पाहिला गेल्याने हॉटस्टार क्रॅश झाल्याचंही या चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सांगितलं. चित्रपट पाहून झाल्यावर अनेक समिक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक तर केलच शिवाय अनेक चाहत्यांनीही या चित्रपटावर भरभरून स्तुतीसुमनं उधळली.


२४ जुलैच्या रात्रीपासून ट्विटर, फेसबूक, इन्स्टाग्रामवर दिल बेचारा या चित्रपटाची चलती पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण या चित्रपटाचे समिक्षण करत आहे. अनेकांनी चित्रपटाला चांगले रेटींग्सही दिले आहेत. त्यातच आयएमडीबी (IMDb) रेटिंगवरदेखील दिल बेचाराने विक्रम केल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला १० पैकी 9.8 रेटिंग मिळालं आहे.

सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याचा शेवटचा चित्रपट चित्रपटगृहात दाखवण्याची मागणी त्याच्या चाहत्यांकडून करण्यात येत होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे हा चित्रपट ओटीटी प्लाटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तो चांगलाच ट्रेण्ड होत असल्याचं दिसून येत आहे.


दरम्यान, ‘दिल बेचारा’ हा सुशांतच्या करिअरमधील अखेरचा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात त्याने मॅनी ही भूमिका साकारली आहे. तर संजना सांघीने किझी ही व्यक्तीरेखा वठविली आहे. मुकेश छाबडा दिग्दर्शित या चित्रपटात स्वस्तिका मुखर्जी, शाश्वत चर्टजी आणि साहिल वेद हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश मनोरंजन

सुशांत सिंहच्या कुटुंबीयांचे नऊ पानी पत्र, विरोधात महागडे वकील आणि पोलीस असताना न्याय कसा मिळेल?

पाटणा – अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्रातील संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबीयांनी एक 9...
Read More
post-image
क्रीडा मुंबई

आयपीएलमध्ये सिलेक्शन न झाल्याने क्रिकेटपटू करण तिवारीची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई – सप्टेंबर महिन्यात होऊ घातलेल्या आयपीएल सामन्यांच्या संघामध्ये निवड झाल्यामुळे निराश झालेल्या मुंबईतील क्रिकेटपटू करण तिवारी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

पुलवामामध्ये दहशतवाद्यांशी चकमक,  1 जवान शहीद, एका दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांची व दहशतवाद यांची जोरदार चकमक अनेक तास सुरू होती. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पुणेकरांना दिलासा! चारही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा, खडकवासला धरण भरले

पुणे – मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चारही धरणात १८.६३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून सर्व धरणांत एकूण ६३.९१ टक्के पाणी भरले...
Read More
post-image
मनोरंजन

स्वरा भास्करचा ‘फ्लेश’मधून उलगडणार वेठबिगारी आणि मानवी तस्करीचे काळे जग

गुन्हेगारी ड्रामा असलेला फ्लेश सीरिज21 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 8 रहस्यमय भागांसह, प्रत्येक भाग 40 मिनिटांचा असून यामध्ये स्वरा भास्कर, अक्षय ओबेरॉय, युधिष्टीर, विद्या...
Read More