बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी घेतली शरद पवारांची भेट – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका गायक तरुणीने बलात्काराचे आरोप केले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या राजीनामा घेण्याचीही मागणी विरोधी पक्षातून करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यात चर्चा झाली.

बलात्काराचा आरोप झाल्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांची भूमिका मांडली होती. त्यांच्यावरील आरोपापेक्षाही त्यांनी केलेल्या कबुलीचा प्रत्येकाने धसका घेतला. त्यामुळे त्यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. अखेर मुंडे यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा केली. तसंच त्यांची भूमिका स्पष्ट केली.

रेणू शर्मा या गायक तरुणीने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. तसंच पोलिस तक्रारीची कॉपीही ट्विट केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांना खुलासा करावा लागला. रेणू शर्मा मला पैशाच्या कारणास्तव ब्लॅकमेलिंग करत आहेत. माझे रेणू यांच्या बहिण करुणा शर्मा यांच्याशी परस्पर सहमतीने संबंध आहेत. तसंच या संबंधातून आम्हाला दोन मुलेही आहेत, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं.

आज पवार यांना भेटून हेच स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलेलं असावं. कारण बुधावारी त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये माझ्या जवळच्या लोकांना आमचे संबंध माहिती आहेत तसंच कुटुंबाला देखील हे सगळं प्रकरण माहिती आहे, असं म्हटलं होतं. साहजिकच पक्षातील जवळच्या लोकांना धनंजय मुंडेंचं हे प्रकरण माहिती असावं, अशी अटकळ आता बांधली जात आहे.

धनंजय मुंडे यांनी पवारांची भेट घेतल्यावर पवारांनी त्यांना नेमका काय सल्ला दिला? किंवा धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणावर आता शरद पवार काय बोलणार? काय निर्णय घेणार, याची प्रतिक्षा आता राज्याला लागली आहे.

धनंजय मुंडे यांनी घेतली अजितदादा, भुजबळांची भेट

तत्पूर्वी, धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्ममंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. या बैठकीला धनंजय मुंडेही उपस्थित होते. मुंडे यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका गायक तरुणीने बलात्काराचे आरोप केले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

…तर आम्ही जनतेला मोफत लस देऊ, दिल्लीकरांना केजरीवालांचा शब्द

नवी दिल्ली – भारतात १६ जानेवारीपासून आपत्कालीन वापरासाठी लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र, हे लसीकरण मोफत असणार की नाही याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंडेवर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर जयंत पाटील यांनी मांडली भूमिका, म्हणाले…

अहमदनगर – धनंजय मुंडे यांच्या वर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी यावर काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे...
Read More
post-image
मनोरंजन

महाराष्ट्राच्या मातीतला संघर्ष ‘केसरी’ 15 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला

इरॉस नाऊने मोठ्या स्वप्नांसह लहान शहरातील तरुण होतकरू कुस्तीपटूची प्रेरणादायक कहाणी सादर करण्याची घोषणा केली आहे, कठोर परिश्रम करून यशस्वी होण्यासाठी केलेली धडपड महेश...
Read More
post-image
आरोग्य महाराष्ट्र मुंबई

गरोदरपणातील थायरॉईडच्या वाढत्या पातळीवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं

आपण गर्भवती आहात? मग, गर्भधारणेदरम्यान थायरॉईड हार्मोनची पातळी नियंत्रणात राहणे गरजेचं आहे. कारण हॉर्मान पातळी योग्यप्रमाणात असल्यास बाळासाठी अतिशय फायदेशीर ठरते. त्यामुळे गर्भारपणात थायरॉईडच्या वाढत्या पातळीवर...
Read More