राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले… – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई – “उच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश दिला होता. ज्याप्रकराचं हे संपूर्ण प्रकरण आहे, या प्रकरणात सीबीआयने चौकशी केली पाहिजे, याची संपूर्ण कारणमीमांसा ही उच्च न्यायालयाने केली होती. तरी देखील सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारने जाण्याचा प्रयत्न केला. स्वतः माजी मंत्री महोदय देखील गेले. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात जी टिप्पणी केली आहे, ती मला असं वाटतं अत्यंत महत्वाची आहे. विशेषकरून महाविकास आघाडीमधील जे नेते या संदर्भात बोलत होते. त्यांना उत्तर देणारी टिप्पणी, ही सर्वोच्च न्यायलयाने केली आहे. मला असं वाटतं की आता योग्य अशाप्रकारची चौकशी होईल आणि चौकशीमधून खरं-खोटं बाहेर निघेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

वाचा – अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, सीबीआय चौकशीविरोधातील याचिका फेटाळल्या

मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका त्यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यावर, सीबीआयने १५ दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत सीबीआय चौकशीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. शिवाय, याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही करण्यात आली होती.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकेत स्फोट

औरंगाबाद – औरंगाबाद शहरातील वाळूज येथील मुख्य रस्त्यावर एका रुग्णवाहिकेचा स्फोट झाला. ही रुग्णवाहिका कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वापरली जात होती. अचानक झालेल्या स्फोटामुळे या रुग्णावाहिकेला आगसुद्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

केंद्राकडून महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाशी खेळ सुरु आहे – संजय राऊत

मुंबई – महाराष्ट्राची लक्तरं निघाली असल्याची टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी जावडेकरांवर निशाणा साधला आहे. जावडेकर हे...
Read More
post-image
महाराष्ट्र

कौमार्य चाचणीत नापास झाल्याने कांजरभाट समाजातील तरुणींता विवाह मोडला

कोल्हापूर – कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणी परीक्षा अद्यापही सुरूच असून यामुळे दोघींची लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरातील कंजारभाट समाजातील दोन तरुणींचा विवाह बेळगावमधील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई – “उच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश दिला होता. ज्याप्रकराचं हे संपूर्ण प्रकरण आहे, या प्रकरणात सीबीआयने चौकशी केली पाहिजे, याची संपूर्ण कारणमीमांसा ही उच्च...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

‘लसींचा पुरवठा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर राज्यांच्या लसीकरणातील कामगिरीच्या आधारावर’

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असून काही ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यातच, केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत दुजाभाव करत...
Read More