अहमदनगर जिल्ह्यातील दत्तू भोकनळला अर्जुन पुरस्कार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील दत्तू भोकनळला अर्जुन पुरस्कार

मुंबई – संगमनेर तालुक्यातील मंगळापुरसारख्या छोट्याशा गावातून आलेल्या दत्तू भोकनळने प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या ध्येय व चिकाटीच्या जोरावर तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण करत यावर्षीचा केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार मिळविला आहे. हा पुरस्कार संगमनेर तालुका व अहमदनगर जिल्ह्याचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

आज केंद्र सरकारच्या वतीने विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली याबाबत बोलताना थोरात म्हणाले की, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार महाराष्ट्रीय क्रिकेटपटू हा रोहित शर्मा यांना मिळाला तर अर्जुन पुरस्कारांमध्ये रोइंग पटू दत्तू भोकनळ, महिला खो खो संघाची कर्णधार सारिका काळे, कुस्तीपटू राहुल आवारे या महाराष्ट्रीयन खेळाडूंनी बाजी मारली आहे. दत्तू भोकनळ हा रोइंमधून देशाचे प्रतिनिधित्व करत असून त्याने ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला मोठे यश मिळवून दिले होते. सातत्याने देशाचे प्रतिनिधित्व करताना त्याने अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

गळापूर येथील अत्यंत गरिब कुटुंबातील दत्तु भोकनळ याने गरिबीचे मोठे चटके सोसले. विहीरीचे खोदकाम केले. त्याची भारतीय सैन्यात निवड झाल्यावर त्याने रोईंग खेळावर लक्ष केंद्रीत करुन आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून ध्येय गाठले. आज त्याच्यामुळे अनेक जण रोईंगचे चाहते झाले. संगमनेर तालुक्यातील अजिंक्य राहणे हा ही तरुणांसाठी रोल मॉडेल आहे. खेळांमधून करिअरच्या अनेक संधी आहेत. पालकांनी मुलांवर आपली आवड न लादता त्यांना खेळू द्यावे. मुलांनी मोबाईल ऐवजी मैदानी खेळांकडे वळावे. यासाठी आपण तालुक्यात विशेष योजना राबवित आहोत. यावर्षी कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव असून अशा कठीण काळात खेळाडूंनी मिळवलेले हे यश नेत्रदीपक आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘लिपिक’ पदाचे पदनाम आता ‘महसूल सहायक’

मुंबई – महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट पदाचे पदनाम आता महसूल सहायक करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. महाराष्ट्र राज्य...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील दत्तू भोकनळला अर्जुन पुरस्कार

मुंबई – संगमनेर तालुक्यातील मंगळापुरसारख्या छोट्याशा गावातून आलेल्या दत्तू भोकनळने प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या ध्येय व चिकाटीच्या जोरावर तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण करत यावर्षीचा केंद्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात १४ हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण

मुंबई – राज्यात आज नव्या १४ हजार १६१ रुग्णांची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही नव्या रुग्णांनी १४ हजारांचा टप्पा पार केल्याने राज्यातील चिंता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सिद्धीविनायक मंदिराने राज्य सरकारला केलेली मदत वादाच्या भोवऱ्यात, बेकायदा व्यवहार झाल्याचा दावा

मुंबई – कोरोनाकाळात शिवभोजन योजनेसाठी आणि कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराने राज्य सरकारला १० कोटींची मदत केली होती. मात्र, ही मदत आता वादाच्या भोवऱ्यात सापडली...
Read More
post-image
देश

येत्या काळात निवडणुकांसाठी काय असतील नियम? निवडणूक आयोगाची नियमावली जाहीर

नवी दिल्ली – कोरोना काळात निवडणुकांचं आयोजन कसं करावं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाने याबाबात नियमावली जारी...
Read More