कोरोना महामारीवर लस बनविणाऱ्या “मॉडर्ना” कंपनीवर सायबर हल्ला – eNavakal
विदेश

कोरोना महामारीवर लस बनविणाऱ्या “मॉडर्ना” कंपनीवर सायबर हल्ला

वॉशिंग्टन – जगाला कोरोना महामारीच्या खाईत लोटल्यावर आता चीन जगातील शत्रु राष्ट्रांवर सायबर हल्ले करीत आहे. ऑस्ट्रेलियावरील सायबर हल्ला हे त्याचे बोलके उदाहरण आहे. आता चिनी सरकारचे पाठबळ लाभलेल्या हॅकर्सनी कोरोना महामारीवरील लस बनविणाऱ्या अमेरिकास्थित मॉडर्ना या अग्रगण्य कंपनीवर सायबर हल्ला केल्याचा दावा अमेरिकेतील सुरक्षा अधिकाऱ्यांनी केला आहे. या हॅकर्सनी कोरोना लस संशोधनाची माहिती चोरण्याच्या उद्देशाने हा सायबर हल्ला केला आहे, असे अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाने दोन चिनी नागरिकांनी अमेरिकेत हेरगिरी केल्याचा आरोप नुकताच केलेला आहे हेरगिरी झालेल्या ठिकाणांपैकी 3 ठिकाणेही कोरोना संशोधनाची संशोधनाशी निगडित असून जानेवारीमध्ये मॅसेच्युसेट्स येथील एका बायोटेक कंपनीच्या कॉम्प्युटर नेटवर्कवर पाळत ठेवल्याचे न्याय विभागाने म्हटले आहे. त्यावरून ही कंपनी मॉडर्नाच असल्याची अटकळ बांधली जात आहे.ली शियाऊ आणि डाॅंग जियाशी या चिनी हॅकर्सनी कोरोना लसीशी संबंधित वैद्यकीय संशोधन गटांनाही लक्ष केले असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघेही हॅकर्स चीनच्या एम एस एस या गुप्तहेर संघटनेने साठी काम करत असल्याचा आरोपही अमेरिकेच्या न्याय विभागाने केला आहे.

मॉडर्ना कंपनीचे प्रवक्ते रे जॉर्डन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आमची कंपनी एफबीआयच्या संपर्कात आहे. आम्ही सायबर हल्ल्यासारख्या संभाव्य धोक्याबाबत सतर्क आहोत. कोरोना लस संशोधनाची महत्त्वपूर्ण माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षाविषयक संस्थांशी आम्ही संपर्क ठेवून आहोत

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
दहशतवादी हल्ला देश संरक्षण

लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा

श्रीनगर – बारामुल्लातील क्रिरी भागात आज सकाळी गस्तीवर असलेल्या सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारात...
Read More
post-image
देश

सरकारमुळे क्रिकेटच्या मैदानावरचं वातावरण भयंकर असेल, इम्रान खानची मोदी सरकारवर टीका

कराची – येत्या काळात भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार का याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यावर आज पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ज्यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

राहुल गांधी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई – फेसबुक आणि व्हाट्स अँप भाजपच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...
Read More
post-image
ट्रेंडिंग मनोरंजन

मध्यमवर्गीय कुटुंबातील निशिकांत कामत यांची मराठी, तामिळ, हिंदी सिनेसृष्टीत दमदार कामगिरी

मुंबई – प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. वयाच्या ५० वर्षीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांनी त्यांच्या संपूर्ण हयातीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यातून आज दिलासादायक आकडेवारी, बरे झालेल्या रुग्णांचीही संख्या अधिक

मुंब –  राज्यात आज कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८४९३ नवीन रुग्णांचे...
Read More