#CWC19 भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट

लंडन – क्रिकेट विश्वचषक २०१९ स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांहून पावसाने बजावलेल्या भूमिकेने चाहत्यांना अधिक आश्चर्यचकित केले. आतापर्यत २ सामने पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आले. सध्यादेखील लंडनमध्ये ढग दाटून आले असून उद्या होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे दिसत आहे. क्रिकेटप्रेमी सुधीर गौतम नॉटिंगहॅमला पोहोचले असून त्यांनी वातावरणाबाबत माहिती दिली आहे. तसेच अभ्यासकांनी उद्याच्या सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज ९० टक्के वर्तविला आहे.

सुधीर गौतम यांनी ट्विटर पोस्ट मध्ये असे म्हटले आहे की, आम्ही भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी नॉटिंगहॅमला पोहोचलो आणि तुम्ही पाहू शकता पावसाने आमचे स्वागत केले. तसेच इतर क्रिडाप्रेमींनी हा वर्ल्डकप आहे की रेनकप अशा प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. १९७९ साली आणि २०१५ साली विश्वचषक स्पर्धेत प्रत्येकी एक-एक सामने पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आले. तर यावर्षी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्ध श्रीलंका हे २ सामने पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आले. त्यामुळे २०१९ची विश्वचषक स्पर्धा सर्वाधिक सामने रद्द होणारी स्पर्धा ठरली आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

होर्डिंग लावल्याने कोणाला तिकीट मिळत नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर बेकायदा होर्डिंग लावण्याचा सपाटा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या होर्डिंगमुळे...
Read More