#CWC19 नॉटिंगहॅममध्ये पाऊस! भारत-न्यूझीलंड सामना ४ तास उशिरा – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 नॉटिंगहॅममध्ये पाऊस! भारत-न्यूझीलंड सामना ४ तास उशिरा

लंडन – विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत आज नॉटिंगहॅम मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना खेळला जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने 3 तर भारताने 2 सामने जिंकून चांगली सुरुवात केली असल्याने या सामन्याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहेच मात्र या सामन्यावर पावसाचे सावट आहे. सध्या नॉटिंगहॅममध्ये पाऊस सुरू असल्याने नाणेफेक उशिरा होणार असून सामना चार तास उशिरा खेळला जाणार असल्याचे समजते आहे. सायंकाळी साधारण सात वाजता खेळपट्टीची पाहणी केली जाणार आहे.

न्यूझीलंडने गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर झेपदेखील घेतली आहे. भारताचा सलामीवीर व डावखुरा फटकेबाज फलंदाज शिखर धवनच्या हाताला दुखापत झाल्यामुळे किमान 3 आठवडे तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता त्याची जागा घेण्यासाठी दिल्‍लीचा कर्णधार आणि युवा यष्टिरक्षक ऋषभ पंतला इंग्लंडला तातडीने पाठविण्यात येणार असल्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. आजच्या या लढतीवर पावसाचे मात्र सावट असल्यामुळे संपूर्ण सामना होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सुरू आहे. या लढतीवर पावसाचे सावट असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे उपहारानंतर हा सामना सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

गेल्या दोनतीन दिवसांपासून लंडनमध्ये सातत्याने मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. हा पाऊस आठवडाभर राहणार असा वेधशाळेने वर्तविला आहे. इंग्लंडच्या बहुतांश भागाला या पावसाचा फटका बसणार आहे. पावसामुळे यंदाच्या या स्पर्धेतील तीन सामने एकही चेंडू न पडता रद्द करण्यात आले. त्यामुळे त्या सामन्यातील संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. पाकिस्तान श्रीलंका, द. आफ्रिका-वेस्ट इंडिज, बांगलादेश-श्रीलंका हे तीन सामने पावसामुळे होऊ शकले नाहीत. यंदाच्या या स्पर्धेत भारताने द. आफ्रिकेला आणि त्यानंतर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. तर न्यूझीलंडने या स्पर्धेत विजयाची शानदार हॅट्ट्रिक केली आहे. त्यांनी श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या लढती जिंकल्या आहेत. आता शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे सलामीत रोहित शर्मासोबत के. एल. राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकर अथवा दिनेश कार्तिक यांच्यामध्ये एकाला संधी देण्याचा विचार संघव्यवस्थापन करत आहे.

शंकर अष्टपैलू असून कार्तिक अनुभवी आहे. त्यामुळे कुणाला खेळवायचे याचा निर्णय आज सामन्यापूर्वी होण्याची शक्यता आहे. तसेच पावसाची शक्यता आणि ढगाळ वातावरण राहणार असल्यामुळे भारतीय संघव्यवस्थापन वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचादेखील अंतिम संघात समावेश करण्यास उत्सुक आहे. शमीला घेतल्यास चहल अथवा कुलदीप यादव यांच्यातील एकाला विश्रांती दिली जाईल. तसेच शंकर आणि कार्तिक या दोघांना संधी दिल्यास अष्टपैलू केदार जाधवलादेखील वगळले जाऊ शकते. येथे पडत असलेल्या पावसामुळे दोन्ही संघांना मैदानात मात्र सराव करता आला नाही. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंनी इनडोअर स्टेडियममध्ये सराव केला. नुकताच झालेल्या आयपीएल स्पर्धेमध्ये न्यूझीलंड कर्णधार विल्यमसन, गुप्टील, बाऊल्ट, सँटनर यांनी चांगली कामगिरी केली होती. तशीच कामगिरी आता या सामन्यात ते करतील, अशी आशा संघव्यवस्थापनाला आहेस् दोन्ही संघ चांगल्या फॉर्मात असल्याने कुठला संघ आज जिंकेल, याचे भाकीत करणे कठीणच आहे. दोन्ही संघातील फलंदाज आणि गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. न्यूझीलंडचा संघ स्पर्धेत नेहमीच धोकादायक संघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या संघाला आपण कमी लेखत नसल्याचे कर्णधार विराटने स्पष्ट केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More
post-image
मुंबई

घाटकोपरमध्ये कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या

मुंबई – घाटकोपर येथे कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घाटकोपर येथे मयांक ट्युटोरियल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २६ सप्टेंबरला पुन्हा मुंबईत

मुंबई – महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असणार असल्याची घोषणा करत भाजपा राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी मुंबईतील गोरेगाव येथील सभेत विधानसभेच्या प्रचाराचा...
Read More