#CWC19 धवनच्या जागी पंत खेळणार? – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 धवनच्या जागी पंत खेळणार?

लंडन – भारताचा सलामीवीर शिखर धवन याला अंगठ्याच्या दुखापतीमुळे ३ आठवड्यांपासून विश्वचषक स्पर्धेपासून दूर राहावे लागणार आहे. यामुळे भारतीय संघासह क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला. शिखर धवनच्या जागी कोण खेळणार, असा प्रश्नही उपस्थित झाला. याच पार्श्वभूमीवर भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत लंडनला रवाना झाला असून तो शिखर धवनच्या जागी खेळणार असल्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहेत. दरम्यान, शिखर धवन दुखापतीमुळे न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांना मुकणार आहे. त्यानंतर तो लवकरात लवकर मैदानात परतावा, अशी आशा क्रिकेटप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ऋषभ पंतने आतापर्यंत भारतीय संघाकडून ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच यावर्षी आयपीएल क्रिकेट चषक स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना त्याच्या नावावर ४८८ धावा आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अमित शहा मुंबईत दाखल; गोरेगावमध्ये सभेचे आयोजन

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. त्यासोबतच आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘तुमच्याकडे काही काम नसेल तर मीम्स बनवा’, सोनाक्षीचे ट्रोलर्सना उत्तर

मुंबई – कौन बनेगा करोडपती -11 मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या रामायण या पौराणिक कथेतील प्रश्‍नावरील उत्तराने सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल व्हावे लागत आहे. सोनाक्षी...
Read More
post-image
लेख

व्हिएतनाम युद्धाविरोधात उभी राहिलेली अमेरिकेची आघाडीची अभिनेत्री जेन फोंडा

साठ-सत्तरच्या दशकातील अमेरिकेची आघाडीची, सुप्रसिद्ध, नामवंत अभिनेत्री जेन फोंडा एका वेगळ्याच कारणासाठी सगळ्या जगभर ओळखली जाते आणि अमेरिकेतील लाखो लोकांकडून तिच्यावर आजही प्रखर टीका...
Read More
post-image
देश

एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिलेला गुगलची मानवंदना

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध गिर्यारोहक आणि माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला जुन्को ताबेई यांचा आज 80 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने गुगलने खास डूडल...
Read More
post-image
देश

भारत २०२१ पर्यंत पहिल्या भारतीयाला स्वतःच्या रॉकेटमधून अंतराळात पाठवणार

नवी दिल्ली – आज ‘लँडर विक्रम’च्या अवतार कार्याचा शेवटचा दिवस होता. मात्र लँडर विक्रमशी संपर्क होऊ शकला नाही. उरली सुरली आशा संपल्यावर इस्त्रो’चे प्रमुख डॉ....
Read More