#CWC19 भारताचा 125 धावांनी विंडीजवर दणदणीत विजय – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 भारताचा 125 धावांनी विंडीजवर दणदणीत विजय

लंडन -विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने आपली विजयीदौड कायम राखताना आज वेस्टइंडीजचा 125 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयाबरोबरच भारतीय संघाने गुणतालिकेत आता दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. 72 धावांची शानदार खेळी करणारा विराट सामनावीर ठरला. विजयासाठी विंडीज संघासमोर 269 धावांचे लक्ष्य होते. पण त्यांचा डाव 34.2 षटकांत 143 धावांतच कोसळला.

सलामीवीर आमब्रीशने सर्वाधिक 31 धावा केल्या. त्यांच्या इतर फलंदाजांनी मात्र साफ निराशा केल्यामुळे या स्पर्धेत त्यांना पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. भारतातर्फे शमीने 4 बळी टिपले. बुमराह, चहलला प्रत्येकी 2 बळी मिळाले. पांड्या, यादवला एक-एक बळी मिळाला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या भारताने 50 षटकांत 7 बाद 268 धावांची मजल मारली. ती कर्णधार विराट आणि धोनी यांनी काढलेल्या अर्धशतकांच्या जोरावर. त्यांना राहुल 48, पांड्या 46 धावा यांनी चांगली साथ दिली.
भारताची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. या स्पर्धेत 2 शतके काढणारा रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला अवघ्या 18 धावा करता आल्या. रोचने रोहितला यष्टिरक्षक होपमार्फत झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या कर्णधार कोहली आणि राहुलने दुसर्‍या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून भारताचा डाव सावरला. ही जोडी जमणार असे वाटत असताना कर्णधार होल्डरने राहुलचा 48 धावांवर त्रिफळा उडवून भारताला दुसरा धक्का दिला.
64 चेंडू खेळताना त्याने 6 चौकार मारले. त्यानंतर विजय शंकर 14 आणि केदार जाधव 7 धावा काढून झटपट बाद झाले. या दोघांना रोचने माघारी पाठविले. मग धोनी आणि विराटने पुन्हा एकदा भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
या दोघांनी 5 व्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. विराटने यंदाच्या स्पर्धेतील सलग चौथे अर्धशतक फटकावले. पण त्या अर्धशतकाचे त्याला शतकात मात्र रुपांतर करण्यात अपयश आले. विराटला कर्णधार होल्डरने 72 धावांवर बाद करून भारताला मोठा धक्का दिला. खराब फटका खेळून विराट ब्राव्होकडे झेल देऊन
माघारी परतला.
विराट बाद झाल्यानंतर धोनी-पांड्याने 6 व्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी करून भारताला 250 धावांचा टप्पा गाठून दिला. पांड्याला शेल्डनने 46 धावांवर बाद केले. तर शमीलादेखील त्याने भोपळा फोडू दिला नाही. संथ फलंदाजी करणार्‍या धोनीने शेवटच्या षटकात 16 धावा फटकावून आपले अर्धशतक पूर्ण केले. विंडीजतर्फे रोचने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर शेल्डन, होल्डरला प्रत्येकी 2 बळी मिळाले. विश्वचषक स्पर्धेत 8 लढतीत भारताचा विंडीज विरुद्ध सहावा विजय होता.

कर्णधार विराटचा विश्वविक्रम

भारतीय कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात 72 धावांची खेळी करून नवा विश्वविक्रम केला.त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यातील आपला 20 हजार धावांचा टप्पा ओलांडला विराटने 415 डावांत 20 हजार धावांचा टप्पा गाठून सर्वात वेगात या धावा पूर्ण करण्याचा मान मिळविला. त्याने सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांच्या अगोदरचा विक्रम मोडीत काढला. या दोघांनी 20 हजार धावा करण्यासाठी 453 डाव खेळले होते. भारतातर्फे 20 हजार धावा करणारा सचिन-द्रविड नंतर तो तिसरा फलंदाज ठरला. तर क्रिकेटविश्वातील तो 12 वा फलंदाज आता ठरला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More