#CWC19 आज यजमान इंग्लंडचा मुकाबला वेस्ट इंडिजशी – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज यजमान इंग्लंडचा मुकाबला वेस्ट इंडिजशी

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज यजमान इंग्लंडचा मुकाबला वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. उभय संघात विंडीजमध्ये झालेल्या वनडे मालिकेत बरोबरी झाली होती. 5 सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली होती. पावसामुळे एक सामना होऊ शकला नव्हता. त्यामुळे आजच्या लढतीत ही बरोबरीची कोंडी फोडण्यास दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. इंग्लंडचे तीन सामन्यांत 4 गुण असून, वेस्ट इंडिजचे तीन सामन्यांत 3 गुण आहेत. इंग्लंडने दोन लढती जिंकल्या. तर पाकिस्तानकडून मात्र त्यांना हार खावी लागली आहे. वेस्ट इंडिजचा एक सामना पावसामुळे झाला नव्हता. तर एकमेव विजय त्यानी पाकिस्तानविरुद्ध मिळविला होता. ऑस्ट्रेलियाकडून त्यांना चुरशीच्या लढतीत हार खावी लागली होती. विंडीजमध्ये झालेल्या वनडे मालिकेत सलामीवीर गेलने तुफानी फलंदाजी करताना चार सामन्यांत 424 धावा केल्या होत्या. त्यामध्ये तब्बल 39 षटकारांचा समावेश होता.

आता आजच्या सामन्यात गेलकडून तशीच कामगिरी संघव्यवस्थापन अपेक्षित करत असेल. मूळचा वेस्ट इंडिजचा पण आता इंग्लंड संघात दाखल झालेला वेगवान गोलंदाज आर्चर याच्या कामगिरीवरदेखील सर्वांचेच लक्ष असेल. तो तेथील स्थानिक ज्युनियर क्रिकेट स्पर्धेत खेळला होता. परंतु यंदा एप्रिल महिन्यात इंग्लंडतर्फे खेळण्याास आर्चर पात्र ठरला. बार्बाडोसचे प्रतिनिधीत्व करणार्‍या आर्चरने तेथे 15, 17, 19 वर्षांखालील विविध स्पर्धेत चमक दाखविली होती. त्यामुळे विंडीज गोलंदाज त्याचा कसा मुकाबला करतात हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

आफ्रिकेविरुद्धचा मागील सामना पावसामुळे झाला नव्हता. त्यामुळे आजच्या लढतीत चांगली कामगिरी करून विजय मिळविण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करू, असे विंडीज कर्णधार होल्डरने सांगितले. अष्टपैलू रसेल दुखापतग्रस्त असल्यामुळे आजच्या सामन्याला मूकणार आहे. तर इंग्लंडचा फटकेबाज फलंदाज दुखापतीतून सावरला असून आजच्या सामन्यात तो खेळेल, असे प्रशिक्षक ट्रेव्हर यांनी सांगितले.

कर्णधार मॉर्गन, बेअरस्टो, रूट, रॉय यांच्यावर इंग्लंडची फलंदाजीची मोठी मदार असेल. वेगवान गोलंदाज कुराना, वूड, व्होकस, प्लंकेट हे त्यांच्या वेगवान गोलंदाजीची धुरा वाहतील. विंडीजची फलंदाजीची मदार ख्रिस गेल, हेटमेअर, होप, कर्णधार होल्डर यांच्या खांद्यावर असेल. तर गोलंदाजीत रोश, थॉमस, ब्रेथवेट यांना या लढतीत चांगला मारा करावा लागेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

चिदंबरम यांच्या भेटीला सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज तिहार रुग्णालयात जाऊन ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More
post-image
मुंबई

घाटकोपरमध्ये कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या

मुंबई – घाटकोपर येथे कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घाटकोपर येथे मयांक ट्युटोरियल...
Read More