#CWC19 आज ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान आमने सामने – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान आमने सामने

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज दोन माजी विश्वविजेते पुन्हा एकदा आमने सामने येत आहेत. गतविजेते ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात आज जोरदार मुकाबला रंगणार आहे. दोन्ही संघ कागदावर बलवान असल्यामुळे ही लढत अटीतटीची होईल अशीच दोन्ही देशांच्या क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे. सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला नमविले होते.

दुसर्‍या लढतीत त्यानी विंडीजला पराभूत केले होते. तिसर्‍या सामन्यात मात्र भारतीय संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला मात्र विंडीजकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते पण पुढच्याच लढतीत त्यानी यजमान इंग्लंडला पराभूत करून स्पर्धेत मोठी खळबळ माजविली होती. तिसरा सामना त्यांचा पावसामुळे होऊ शकला नव्हता. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या या लढतीत त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले होते. भारताविरुद्ध पराभव विसरून आता नव्या जोमाने आम्ही आजच्या लढतीत खेळू, असे ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने सांगितले. पाकिस्तानला आम्ही कमी लेखत नाहीत. कुठल्याही क्षणी हा संघ सामन्यात कम बॅक करू शकतो. असेही फिंच म्हणाला.
या सामन्यात कर्णधार फिंच, वॉर्नर, माजी कर्णधार स्मिथ यांच्यावर त्यांची फलंदाजीची मोठी मदार असेल, तर कमीन्स, झंपा, स्टार्क, रिचर्डसन यांच्यावर गोलंदाजीची मदार असेल. भारताविरुद्ध त्यांच्या गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे भारताला मोठी धावसंख्या काढता आली होती. आता आजच्या लढतीत त्यांच्या गोलंदाजांना आपल्या कामगिरीत चांगलीच सुधारणा करावी लागणार आहे. तरच ते या सामन्यात विजयाची आशा धरू शकतात. तसेच कर्णधार फिंच, मॅक्सवेल यांनादेखील फलंदाजीत मोठी धावसंख्या काढावी लागणार आहे.

पाकिस्तान आपला स्पर्धेतील दुसरा विजय मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. सलामीवीर हक, झमान, बाबर आझम, हाफिज, मलिक यांच्यावर त्यांची फलंदाजीची दारोमदार असेल. तर गोलंदाजीत आफ्रिदी, मोहम्मद, रियाझ, सोहेल यांच्यावर त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाला आम्ही चांगली झुंज देऊन सामना जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करू, असे कर्णधार सर्फराज अहमदने सागितले. इंग्लंडला नमविल्यामुळे आमच्या संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. सर्वच खेळाडू चांगली कामगिरी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही सर्फराज म्हणाला. या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या होण्याची शक्यता आहे. खेळपट्टी सुरुवातीला गोलंदाजांना आणि नंतर फलंदाजांना साथ देईल. सामन्यातील दोन्ही संघ सामन्यापूर्वी जाहीर करण्यात येतील. दोन्ही संघांसाठी ही महत्त्वपूर्ण लढत आहे. विश्वचषक स्पर्धेत झालेल्या उभय संघातील लढतीत नेहमीच रंगतदार झाल्या आहेत. आजची लढतदेखील रंगतदार होईल, अशी आशा दोन्ही देशांचे क्रिकेटप्रेमी करत असतील. नाणेफेक जिंकणार्‍या संघाला फायदा होईल. प्रथम फलंदाजी करणारा संघ चांगली धावसंख्या काढू शकेल, असे खेळपट्टी तयार करणार्‍या क्युरेटरने सांगितले. दोन्ही संघातील खेळाडूंची अंतिम निवड सामन्यापूर्वीच होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघातील प्रमुख खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे संघव्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले. ऑस्ट्रेलिया संघ स्पर्धेतील तिसरा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न करेल.

दुखापतग्रस्त स्टॉयनीस पाकच्या लढतीला मूकणार

आज होणार्‍या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस् स्टॉयनीस हाताला झालेल्या दुखापतीमुळे सामन्याला मूकणार आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात धोनीचा झेल घेताना त्याच्या हाताला दुखापत झाली होती. ती दुखापत आता चिघळली असल्यामुळे आजच्या लढतीत तो खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियाने त्याच्या जागी अष्टपैलू मिचेल मार्शला तातडीने पाचारण केले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More