#CWC  रोमहर्षक सामन्यात इंग्लंड जगज्जेते – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC  रोमहर्षक सामन्यात इंग्लंड जगज्जेते

लंडन- क्रिकेटच्या पंढरीत लॉर्डस मैदानात अखेर यजमान इंग्लंडने विश्वचषकावर पहिल्यांदाच नाव कोरण्याचा पराक्रम केला. निर्णायक सामन्यात रोमहर्षक लढतीत इंग्लंडने न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करून अखेर चौथ्या प्रयत्नात विश्वचषकाला गवसणी घातली. दोन्ही संघांनी प्रत्येकी 241 धावा केल्यामुळे सामन्याचा निकाल अखेर सुपर ओव्हरमध्ये लावण्यात आला. त्यात इंग्लंडने बाजी मारली.  सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी न्यूझीलंडला 16 धावांचे लक्ष्य होेते. पण आर्चरच्या शेवटच्या चेंडूवर गुप्टील धावचित झाला आणि इंग्लंडच्या ऐतिहासिक जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. सलग दुसर्‍या वर्षी न्यूझीलंडला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. लॉर्डस मैदानावर नाणेफेक हरणारा संघ सलग पाचव्यांदा जगजेत्ता ठरण्याचा आगळा विक्रम झाला.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडला विजयासाठी न्यूझीलंडने 242 धावांचे आव्हान दिले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या न्यूझीलंडने 50 षटकांत 8 बाद 241 धावांची मजल मारली. त्यांच्या सलामीवीर निकोलसने सर्वाधिक 55 धावा केल्या. त्याने कर्णधार विल्यमस्नसोबत दुसर्‍या विकेटसाठी 74 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. विल्यमसनने 30, यष्टीरक्षक लॅथमने 47 धावा केल्या. विल्यमसनने विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा नवा विक्रम केला. त्याने अगोदरचा जयवर्धनेचा 548 धावांचा विक्रम मोडला. इंग्लंडतर्फे वोक्स आणि प्लंकेटने प्रत्येकी 3 बळी घेतले तर आर्चर आणि वूडला प्रत्येकी 1 बळी मिळाला.

गेले सव्वा महिने सुरू असलेली 12 वी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आज संपन्न होत असून क्रिकेटच्या पंढरीत लॉर्ड्स मैदानावर यजमान इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात विजेतेपदासाठी जोरदार मुकाबला होत आहे. या दोन संघांनी आतापर्यंत कधीच विश्वचषक उंचावला नसल्यामुळे क्रिकेटविश्वाला यंदा नवा विजेता मिळणार आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यांचा सलामीवीर मार्टिन गुप्टील याला अवघ्या १९ धावांमध्ये इंग्लंडने माघारी पाठवले आहे. वोक्सच्या गोलंदाजीत तो बाद झाला आणि न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. आता निकोलस आणि विल्यम्सन न्यूझीलंडकडून फलंदाजी करत आहेत.

कागदावर तरी यजमान इंग्लंडचेच पारडे जड असून त्यांच्याच जेतेपदाची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. खेळाच्या दोन प्रमुख अंगात फलंदाजी आणि गोलंदाजी यात इंग्लंड संघ सरस वाटतो. उभय संघात झालेल्या पहिल्या टप्प्यातील लढतीत इंग्लंडनेच बाजी मारली होती. त्याचीच पुनरावृत्ती आम्ही अंतिम सामन्यात करणार, असा विश्वास इंग्लंड कर्णधार मॉर्गने व्यक्त केला आहे. तर त्या पराभवाचा बदला घेऊन आम्ही पहिले विजेतेपद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करू, असे न्यूझीलंड कर्णधार केम विल्यमसनने सांगितले.

उभय संघांनी स्पर्धेतला सुरुवातीचे काही सामने जिंकून जोरदार सुरुवात केली होती पण स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात या दोन्ही संघांची विजयीदौड रोखली गेल्यामुळे हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार की नाही याबाबत थोडेे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. इंग्लंडला तर उपांत्य फेरी गाठण्यासाठी शेवटच्या दोन्ही भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय आवश्यक होता. तर न्यूझीलंडलादेखील आपल्या शेवटच्या लढतीत उपांत्य फेरी गाठण्यासाठी विजय मिळविणे गरजेचे होते. इंग्लंडने दोन्ही लढती जिंकून उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोेेर्तब केले. तर सरस धावगतीच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानला मागे टाकून उपांत्य फेरीचे तिकीट बुक केले. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने पहिल्या लढतीत भारताला दणका दिला. तर दुसर्‍या सामन्यात यजमान इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव चाखायला लावली.

इंग्लंडने चौथ्यांदा तर न्यूझीलंडने सलग दुसर्‍यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. तब्बल 27 वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा इंग्लंड संघ अंतिम फेरीत खेळणार आहे. इंग्लंडची सलामीची जोडी रॉय-बेअरस्टो चांगलीच फॉर्मात असून त्यांनी गेल्या काही सामन्यांत इंग्लंडला धडाकेबाज सुरुवात करून दिली आहे. त्यामुळेच मधल्या फळीत फलंदाजांचे दडपण कमी झाले. त्याचा फायदा इंग्लंड संघाला मिळाला.

रॉय-बेअरस्टो बरोबरच कर्णधार मॉर्गन, बटलर, रूट यांच्यावर इंग्लंडची फलंदाजीची मदार असेल. तर गोलंदाजीत आर्चर, वोक्स, स्टोक, राशिद यांच्यावर त्यांची मदार राहणार आहे. न्यूझीलंड कर्णधार विल्यमसन चांगला फॉर्मात असून त्यानेच त्यांची मोठी खिंड लढविली आहे. त्याला उपकर्णधार टेलरची थोडीफार साथ मिळाली पण इतर फलंदाज मात्र अपयशी ठरले आहेत. त्यामुळे फलंदाजीची मोठी समस्या न्यूझीलंड समोर असणार आहे. त्यामुळे त्यांच्या फलंदाजांना चांगला सूर गवसला तरच ते विजयाची आशा बाळगू शकतात. सँटनर, साऊदी, बोल्ट, हेन्री यांच्याकडून गोलंदाजीत मोठी आशा न्यूझीलंड संघ बाळगून आहे. लॉर्ड्स खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजांना साथ देईल. तर नंतर फिरकी गोलंदाज या खेळपट्टीचा फायदा घेऊ शकतात. सामन्यातील नाणेफेक महत्त्वाची असून ती जिंकणार्‍या संघाला फायदा मिळू शकतो.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More