मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डोंबिवलीतील कोविड रुग्णालयाचे ऑनलाइन उद्घाटन – eNavakal
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डोंबिवलीतील कोविड रुग्णालयाचे ऑनलाइन उद्घाटन

कल्याण – एकजिनसीपणे संघटितपणे कोविड निर्मूलनाचे काम हाती घेतले आहे, त्‍यामुळे महाराष्‍ट्राला लवकरात लवकर या संकटातुन बाहेर काढू, असा आशावाद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज व्‍यक्‍त केला. डोंबिवली जिमखाना, येथे कोव्हिड रुग्णांसाठी समर्पित कोविड रूग्‍णालयाचे ऑनलाईन लोकार्पण करताना त्‍यांनी हे वक्तव्य केले.

वाचा – भजन, आरतीसाठी गर्दी नको, कोकणातील गणेशोत्सवासाठी गाईडलाईन्स जारी

गणपतीच्‍या आगमनानंतर आधीची विघ्‍ने नष्‍ट होतात, तसेच कोरोनाचे संकटही नष्‍ट व्‍हावे, ही गणराया चरणी प्रार्थना, असे उद्गार त्‍यांनी यावेळी काढले. मुंबईत आता हायथ्रुपुट ही लॅब सुरू झाली, असुन त्‍यामध्‍ये एका दिवसात १२०० टेस्‍ट होतात व कमीत कमी मानवी संपर्क राहतो, अशी माहिती त्‍यांनी यावेळी दिली. असिंम्‍प्टोमॅटिक पेशंटला देखील व्‍यवस्थित आयसोलेशन करणे गरजेचे आहे. कोरोनाशी लढण्‍यापेक्षा त्‍यापासून दुर राहणे आपले हाती आहे, गावागावात कोरोनाबाबत दक्षता कशी घ्‍यावी याची जनजागृती करावी, म्‍हणजे कोरोनाची काळजी करण्‍याची आवश्‍यकता नाही, असेही ते यावेळी म्‍हणाले.

वाचा – राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर, रोहीत शर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगट यांची मोहोर

कोरोनाशी लढुन हरविण्‍यापेक्षा कोरोना होणारच नाही, यासाठी शक्‍यतोवर काळजी घ्‍यावी, देशात ठाणे महापालिकेचा रिकव्‍हरी रेट ८९ टक्‍के व कडोंमपाचा रिकव्‍हरी रेट ८५ टक्‍के आहे, हे दिलासा दायक चिञ असल्‍याचे उद्गार उपमुख्‍यमंञी अजित पवार यांनी या ऑनलाईन लोकार्पण सोहळया समयी काढले. डोंबिवली जिमखान्‍यातील कोविड रूग्‍णालय हि एक अप्रतिम व्‍यवस्‍था असल्‍याचे राज्‍याचे आरोग्‍य मंञी राजेश टोपे यांनी या ऑनलाईन सोहळयात सांगितले.

वाचा – मुंबईतील ‘ही’ तीन मंदिरे सुरू होणार, सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

तर अतिशय कमी वेळात एमएमआर क्षेञात अनेक सुविधा कोविड साठी सुरू केल्‍या आहेत. कोविड रिकव्‍हरी मध्‍ये ठाणे महापालिकेचा राज्‍यात प्रथम असून कडोंमपाचा क्रमांक दुसरा असल्याची माहिती पालकमंञी एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

वाचा – यंदा गणपतीच्या दर्शनासाठी कुणालाही परवानगी देऊ नका! अजित पवारांचे आदेश

या कोविड रुग्‍णालयात ७० बेड आयसीयू, ५१ बेड ऑक्‍सीजन सुविधा उपलब्‍ध असणार असून त्‍यातील ३ बेड डायलिसीस रुग्‍णांकरीता राखीव ठेवण्‍यात आलेले आहेत. याव्‍यतिरिक्‍त ३० व्‍हेंटीलेटर व ४० Biapap आणि ५  High Flow Nasal Oxygen Machine सुविधा देखील उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे. या रुग्‍णालयात रुग्‍णांसाठी अत्‍याधुनिक व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली असून संपूर्ण रूग्‍णालय हे वातानुकुलित व इंटरनेट सुविधायुक्‍त आहे. त्‍याचप्रमाणे रुग्‍णांसाठी खास सुरेल संगीताची व्‍यवस्‍था देखील करण्‍यात आलेली आहे.

वाचा मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपांवर तपासणी पथकांची देखरेख

या लोकार्पण सोहळया समयी पालकमंञी एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्‍हाण, महापौर विनिता राणे तसेच इतर पालिका सदस्‍य, महापालिका अधिकारी/कर्मचारी , डोंबिवली जिमखान्‍याचे मोकाशी व इतर मान्‍यवर डोंबिवली जिमखाना येथे उपस्थित होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पात भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू

हैदराबाद – ठिकठिकाणी आगीच्या घडत असून तेलंगणातील श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पातही गुरुवारी भीषण आग लागली होती. या आगीत जवळपास ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गुरुवारी...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डोंबिवलीतील कोविड रुग्णालयाचे ऑनलाइन उद्घाटन

कल्याण – एकजिनसीपणे संघटितपणे कोविड निर्मूलनाचे काम हाती घेतले आहे, त्‍यामुळे महाराष्‍ट्राला लवकरात लवकर या संकटातुन बाहेर काढू, असा आशावाद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज व्‍यक्‍त केला. डोंबिवली जिमखाना, येथे...
Read More
post-image
मनोरंजन

तापसी पन्नू दिसणार आता खेळाडूच्या भूमिकेत

विविध साहसी भूमिका साकारणाऱ्या तापसी पन्नू आता एका खेळाडूची भूमिका साकारणार आहे. भारताची वेगवान धावपट्टू रश्मीचा लवकरच बायोपिक येणार असून या चित्रपटात तापसी रश्मीची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर, रोहीत शर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगट यांची मोहोर

नवी दिल्ली – राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाले असून भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट यांना हा पुरस्कार मिळाला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पवारांच्या बारामती येथील निवासस्थानीही कोरोनाचा शिरकाव

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता त्यांच्या बारामतीतील निवासस्थानीही कोरोनाची लागण झाली...
Read More