Coronavirus : बंदी असतानाही बाहेर गेल्याने सख्या भावाची हत्या; मुंबईतील घटना – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

Coronavirus : बंदी असतानाही बाहेर गेल्याने सख्या भावाची हत्या; मुंबईतील घटना

मुंबई – कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यावर बंदी आहे. तर यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. असं असताना मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉकडाउन असतानाही घराबाहेर पडलेल्या सख्या भावाची हत्या करण्यात आली आहे. कांदिवलीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचा मोठा भाऊ त्याला घराबाहेर जाऊ नको, असं वारंवार सांगत होता. मात्र धाकटा भाऊ ऐकत नसल्याने त्याची हत्या करण्यात आली. मृत व्यक्ती हा पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. कोरोनामुळे कंपनीतील काम बंद झाल्याने तो आपल्या घरी मुंबईत परतला.

यावेळी तो बंदी असतानाही घराबाहेर पडला. त्यानंतर घरी परतल्यावर मोठा भाऊ व त्याच्या पत्नीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. नंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला. दरम्यान, उपचारसाठी रुग्णालयात नेलं असता धाकट्या भावाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More