कोरोनाचे मृतदेह दफन करता येणार, मुंबई हायकोर्टाची परवानगी – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कोरोनाचे मृतदेह दफन करता येणार, मुंबई हायकोर्टाची परवानगी

मुंबई – कोरोनामुळे (coronavirus) मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृतदेह दफन करु नये याबाबत अनेक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. यावर मृतदेह दफन करण्यास परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टाने घेतला आहे. एवढेच नव्हे तर याबाबत मुंबई महापालिकेने नव्याने आदेश काढावेत. तसेच मृतदेह दफन करताना नातेवाईकांची पूर्ण काळजी घेण्यात यावी, असेही कोर्टाने या आदेशात म्हटले आहे.

वाचा – हिंगोली जिल्ह्यात आणखी 6 जणांना कोरोनाची लागण

काही धर्मांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह दफन करण्याची पद्धत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृतदेहामार्फत कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून मुंबई महापालिकेने मृतदेहाचे दफन करु नये असे परिपत्रक 30 मार्चला काढले होते. पण त्यानंतर त्याच दिवशी ज्या दफनभूमीत मोठी जागा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मृतदेह दफन करु शकता, अशा आशयाचा दुसरा सुधारित आदेश पालिकेने काढला होता. या दोन्ही आदेशाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका करण्यात आली होती. यात दुसऱ्या सुधारित आदेशाविरोधात वांद्रे परिसरातील राहणारे प्रदीप गांधी यांनी कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. त्यात त्यांनी वांद्रे येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये दफन विधी करू नये अशी मागणी केली होती. तर पालिकेच्या पहिल्या आदेशाविरोधात ऍड. अल्ताफ खान यांनी याचिका दाखल केली होती. त्यात पालिकेने कोणत्याही वैज्ञानिक कारणाशिवाय दफन विधी करू असे काढलेले आदेश रद्द करावेत अशी मागणी केली होती. या दोन्ही याचिकेवर निकाल देताना कोर्टाने कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यास परवानगी देत मुस्लिम कब्रस्तान विरोधातील याचिका फेटाळून लावली.

वाचा – धक्कादायक! हैदराबादमध्ये एकाच विहिरीत आढळले 9 मृतदेह

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More
post-image
महाराष्ट्र

साताऱ्यात २४ तासांत २७ जण कोरोना पॉझिटिव्ह; तर दोघांचा मृत्यु

सातारा – सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २७जण पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांचा आकडा ३३६ वर पोहचला आहे. तसेच या कालावधीत वाई तालुक्यातील दोन कोरोनाबाधीत...
Read More
post-image
मनोरंजन

ईदनिमित्त भाईजानकडून ५,००० कुटुंबांना अन्नदान

मुंबई – सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. त्याचा मोठा फटका बहुतांश मजुरांना बसला आहे. अशा संकटाच्या काळात ईदच्या दिवशी कुणीही उपाशी राहू नये. यासाठी अभिनेता...
Read More
post-image
अपघात

कोपरगाव -सिन्नरच्या सीमेवर ट्रकने चेकपोस्टला उडवले

शिर्डी – कोपरगाव -सिन्नर तालुक्यातील सीमेवर पाथरे फाटा येथे लावण्यात आलेल्या चेकपोस्ट जवळच्या तंबूत नाशिकहून भरधाव येणारा ट्रक काल रात्री घुसला आणि कर्तव्यावर असलेले...
Read More
post-image
मुंबई

केईएमच्या शवागृहाची विदारक स्थिती; मृतदेह ठेवायला जागाच नाही!

मुंबई – मुंबईत कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच केईएम रुग्णालयातील शवागृह मृतदेहांनी खचाखच भरले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या...
Read More