जगभरात नव्या ४ लाख कोरोना रुग्णांची नोंद, भारत दुसऱ्या स्थानावर कायम – eNavakal
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश विदेश

जगभरात नव्या ४ लाख कोरोना रुग्णांची नोंद, भारत दुसऱ्या स्थानावर कायम

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरस जगभर धुमाकूळ घालतो आहे. दरदिवशी जगभरातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच जगभरात पहिल्यांदाच एकाच दिवसांत 4 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासांत जगभरात पहिल्यांदाच सर्वाधिक 4.12 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच शुक्रवारी  3.97 लाख नवे कोरोना बाधित आढळून आले होते. या व्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत 6185 लोकांचा मृत्यू झाला आहे.

वाचा – देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ लाखांच्याही खाली, नव्या ६२ हजार रुग्णांची नोंद

वर्ल्डोमीटरनुसार, जगभरात आतापर्यंत 3 कोटी 95 लाख 65 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 11 लाख 8 हजार 617 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2 कोटी 96 लाख 48 हजार रुग्ण बरे झाले आहेत. संपूर्ण जगभरात केवळ 88 लाखांहून अधिक अॅक्टिव्ह केस आहेत.

वाचा – जागतिक भूक निर्देशकांत भारत ९४ व्या स्थानी, जगात ६० लाखांपेक्षा अधिक लोक कुपोषित

टॉप-10 कोरोना बाधित देशांची यादी

अमेरिका : एकूण रुग्ण 8,288,278, मृत्यू 223,644
भारत : एकूण रुग्ण 7,430,635, मृत्यू 113,032
ब्राजील : एकूण रुग्ण 5,201,570, मृत्यू 153,229
रशिया : एकूण रुग्ण 1,369,313, मृत्यू 23,723
स्पेन : एकूण रुग्ण 982,723, मृत्यू 33,775
अर्जेंटीना : एकूण रुग्ण 965,609, मृत्यू 25,723
कोलंबिया : एकूण रुग्ण 945,354, मृत्यू 28,616
पेरू : एकूण रुग्ण 862,417, मृत्यू 33,648
मेक्सिको : एकूण रुग्ण 834,910, मृत्यू 85,285
फ्रान्स : एकूण रुग्ण 834,770, मृत्यू 33,303

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश विदेश

जगभरात नव्या ४ लाख कोरोना रुग्णांची नोंद, भारत दुसऱ्या स्थानावर कायम

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरस जगभर धुमाकूळ घालतो आहे. दरदिवशी जगभरातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भिवंडी, शहापूर भागात भातपीक जमिनीखाली, पंचनामे करण्यास अधिकाऱ्यांचा नकार

भिवंडी – भिवंडी व शहापूर ग्रामीण भागात होणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असताना देखील प्रशासन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

भारताच्या महिला स्टार गोलंदाजाला कोरोनाची लागण, महिला टी20 चॅलेंजमधूनही बाहेर

नवी दिल्ली – कोरोनाचा संसर्ग जवळपास प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला होत आहे. त्यातच, अनेक खेळाडूंनाही कोरोनाची लागण होत आहे. आता भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज...
Read More
post-image
महाराष्ट्र

मेट्रो-३: ३३ वे भुयारीकरण पूर्ण, चर्चगेट ते हुतात्मा चौक दरम्यान बोगदा तयार

मुंबई – कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या चर्चगेट ते हुतात्मा चौक येथील मेट्रो स्थानकादरम्यान असलेला बोगदा शुक्रवारी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. मेट्रो ३ च्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ लाखांच्याही खाली, नव्या ६२ हजार रुग्णांची नोंद

नवी दिल्ली – गेेल्या २४ तासांत देशात ६२ हजार २२१ नव्या कोरोना रुग्णांची तर  ८३७ मृतांची नोंद झाली आहे.  आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे देशात ७४ लाख...
Read More