मुंबई – राज्यात कोरोनाचा धोका कमी झालेला नसून आज दिवसभरात तब्बल 56 हजार 286 बाधितांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढ होत असल्याने सरकारकडून सातत्याने नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यात आज 56286 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आणि आज नवीन 36 हजार 130 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 26 लाख 49 हजार 757 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 5 लाख 21 हजार 317 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.05% झाले आहे.