मुंबई – राज्यात आज तब्बल ५९ हजार ९०७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. आज रुग्णांची सर्वाधिक वाढ झालेली असून मृतांचा आकडाही वाढला आहे. गेल्या २४ तासांत 322बाधितांच्या मृतांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढला आहे.
गेल्या २४ तासांत ५९ हजार ९०७ रुग्णांची वाढ झाली असून ३० हजार २९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यतं २६ लाख १३ हजार ६२७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर, राज्यात एकूण 50 हजार 1559 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.36% झाले आहे.
मुंबईत १० हजार ४२८ रुग्णांची वाढ झाल्याने मुंबईतील एकूण बाधितांचा आकडा ४ लाख ८२ हजार ७६० वर पोहोचला आहे. तर, आज ६ हजार ७ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत ३ लाख ८८ हजार ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज २३ बाधितांच्या मृतांची नोंद झाल्याने मुंबईत एकूण ११ हजार ८५१ बाधितांनी कोरोनामुळे आपला प्राण गमावला आहे. त्यामुळे सध्या मुंबईत ८१ हजार ८८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या मुंबईत ८० टक्के रिकव्हरी रेट आहे. तर डबलिंग रेट ३५ दिवसांवर आला आहे.
वाचा – साताऱ्यात लसीचे डोस संपले, पुढील डोस येईपर्यंत लसीकरण बंद राहणार
मुंबईप्रमाणेच कल्याण -डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातही कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. गेल्या २४ तासांत या क्षेत्रात १ हजार ७८२ नवे रुग्ण सापडले आहेत. सध्या या क्षेत्रात १२ हजार ८७ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ७५ हजार १६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज ९८७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज ३ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
वाचा – …तर येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रातील लसीकरण बंद होईल, राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती
ठाण्यातही आज १ हजार ६१९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ११११ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच आज ५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ठाण्यात कोरोनामुळे १ हजार ४२२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर १३ हजार ४८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.