कोरोनामुक्त झालेल्या न्युझीलंडमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, निवडणुका लांबणीवर – eNavakal
विदेश

कोरोनामुक्त झालेल्या न्युझीलंडमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, निवडणुका लांबणीवर

ऑकलंड – कोरोनामुक्त झाल्यानंतर न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. मागील २४ तासात न्यूझीलंडमध्ये १३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंडमधील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६९ झाली आहे. जून महिन्यात न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. तसेच १०० दिवसात एकही रुग्ण आढळला नव्हता. पण आता पुन्हा एकदा कोरोनाने देशात शिरकाव केला आहे. कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढल्याने सर्वसाधारण निवडणुका चार आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

आरोग्यविषयक महासंचालक अॅशले ब्लूमफील्ड यांच्या माहितीनुसार, “सर्व नवे कोरोनाबाधित हे ऑकलंडमधील एक क्लस्टरशी संबंधित आहेत. यामधील एक मुलगा या महिन्याच्या सुरुवातील अफगाणिस्ताहून न्यूझीलंडमध्ये होता. सुरुवातीला तो कोरोना निगेटिव्ह होता. पण १४ दिवसांच्या क्वॉरन्टाईन पीरियडच्या बाराव्या दिवशी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तेव्हापासून तो ऑकलंडमध्ये क्वॉरन्टाईन आहे. तर इतर १२ कोरोनाबाधित कम्यूनिटीमधील होते.”

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

कोरोनामुक्त झालेल्या न्युझीलंडमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, निवडणुका लांबणीवर

ऑकलंड – कोरोनामुक्त झाल्यानंतर न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. मागील २४ तासात न्यूझीलंडमध्ये १३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंडमधील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

दिलासादायक! मुंबईतील २० वॉर्डमध्ये कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापेक्षा कमी

मुंबई – कोरोनाच्या साथीने गेले पाच महिने मुंबईत तळ ठोकला आहे. पण हळूहळू कोरोनाने मुंबईतील काही विभागांमधून काढता पाय घ्यायला सुरुवात केल्याचे चित्र आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश शिक्षण

नीट आणि जेईईच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज देशातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा समजल्या जाणाऱ्या जेईई मेन(JEE Main) 2020 आणि नीट (NEET)2020 या दोन्ही परीक्षा ठरलेल्या वेळीच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

‘सिल्व्हर ओक’वरील ५ जणांना कोरोनाची लागण! शरद पवार निगेटिव्ह

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असतानाही राज्याच्या विविध भागांना भेटी देताना पाहायला मिळत आहेत. मात्र आता एक...
Read More
post-image
क्रीडा

क्रिकेटमधील निवृत्‍तीनंतर धोनीचे मनोरंजन क्षेत्रात पाऊल

मुंबई – भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने 15 ऑगस्टला क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता महेंद्रसिंग धोनी हा मनोरंजन आणि चित्रपट निर्मिती...
Read More