कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसमोर नवा तिढा – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसमोर नवा तिढा

नवी दिल्ली – आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससमोर नवा पेच निर्माण झाला आहे. मित्रपक्षाने मोक्याच्या जागांची मागणी केल्याने ही अडचण कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीसमोर उभी राहिली आहे. यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात दिल्ली दरबारी तोडगा काढण्याची तयारी सुरु असल्याचे समजते आहे. यासाठी घटक पक्षांत चर्चा होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजु शेट्टी यांनी मोक्याच्या २ जागांची मागणी केली आहे. बुलढाणा मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने आता राष्ट्रवादी कचाट्यात सापडली आहे. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी मतदारसंघाची मागणी केली असल्याची माहिती मिळत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र

टोमॅटोच्या भावात मोठी घसरण; २० किलोच्या कॅरेटला १०० रुपये

मनमाड – खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून असणारे टोमॅटो पीक शेतकर्‍याची चिंता वाढवू लागली आहे. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. घाऊक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More