कोणत्याही अटी-शर्थींशिवाय नक्षलवाद्यांनी जवानाला सुरक्षित सोडलं – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

कोणत्याही अटी-शर्थींशिवाय नक्षलवाद्यांनी जवानाला सुरक्षित सोडलं

रायपूर – छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्या २२ जवान शहीद झाले होते. यामध्ये एक जवान नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडला होता. या जनावाला सोडवण्यासाठी हरतर्हेचे प्रयत्न सुरू होते. अखेर आज या जवानाला सुरक्षितरित्या सोडण्यात आलं. 3 एप्रिलला बिजापूर (Bijapur) इथं चकमक झाली होती. त्यावेळी नक्षलवाद्यांनी कमांडो राकेश्वर सिंह मन्हास यांचं अपहरण केलं होतं. मात्र शेकडो गावकऱ्यांसमोर नक्षलवाद्यांनी जवानाची सुटका केली.

पद्मश्री धर्मपाल सैनी यांच्या उपस्थितीत कोणत्याही विनाअटीशिवाय नक्षलवाद्यांनी जवानाला कोणतीही दुखापत न करता सोडून दिलं. तिथून रवाना झाल्यानंतर जवान राकेश्वर CRPF कॅम्पमध्ये दाखल झाले. राकेश्वर सिंह मन्हास हे तब्बल 6 दिवस नक्षलवाद्यांच्या ताब्यात होते. त्यांच्या सुटकेसाठी सरकारकडून दोन सदस्यीय समिती स्थापन केली होती. यामध्ये पद्मश्री धर्मपाल सैनी, गोंडवाना समाजाचे अध्यक्ष तेलम बोरैया यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत जवानाला सोडण्यात आलं.

11 सदस्यांची टीम बस्तरमध्ये

जवानाच्या सुटकेसाठी दोन सदस्यीय टीमसह 7 पत्रकारांची टीमही उपस्थित होती. मध्यस्थीसाठी 11 जणांचं पथक बस्तरमधील बीहड इथे गेलं होतं. नक्षलावाद्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर अखेर जवानाची सुटका करण्यात आली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कोणत्याही अटी-शर्थींशिवाय नक्षलवाद्यांनी जवानाला सुरक्षित सोडलं

रायपूर – छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्या २२ जवान शहीद झाले होते. यामध्ये एक जवान नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडला होता. या जनावाला सोडवण्यासाठी हरतर्हेचे प्रयत्न सुरू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सीबीआयने सचिन वाझेंसह चौघांचा जबाब नोंदवला, अनिल देशमुखांचे भवितव्य टांगणीला

मुंबई – आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटीच्या वसुलीप्रकरणी आता CBI अॅक्शन मोडमध्ये आली आहे. कारण आता कोर्टाच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा महाराष्ट्र

सचिन तेंडुलकरला रुग्णालयातून डिस्चार्ज, पुढील काही दिवस राहणार आयसोलेट

मुंबई – माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने कोरोनावर मात केली असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याला २७ मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती,...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

रेमडीसीवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी एमआरपी कमी करावी, राजेश टोपेंचे निर्देश

मुंबई – राज्यात जाणवणाऱ्या रेमडीसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महाराष्ट्राला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकेत स्फोट

औरंगाबाद – औरंगाबाद शहरातील वाळूज येथील मुख्य रस्त्यावर एका रुग्णवाहिकेचा स्फोट झाला. ही रुग्णवाहिका कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वापरली जात होती. अचानक झालेल्या स्फोटामुळे या रुग्णावाहिकेला आगसुद्धा...
Read More