#CincinnatiMastersChampion जोकोविचने रचला इतिहास! – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

#CincinnatiMastersChampion जोकोविचने रचला इतिहास!

सिनसिनाटी – सर्बियाच्या टेनिस स्टार नोव्हक जोकोविचने सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. या विजयाबरोबरच जोकोविचने सर्व नऊ मास्टर्स १००० स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला आहे. मास्टर्स प्रकारातील सर्व स्पर्धा जिंकणारा जोकोविच हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

जागतिक क्रमवारीमध्ये १०व्या क्रमांकावर असणाऱ्या जोकोविचने पुरूष एकेरी स्पर्धेत जागतिक क्रमावारीमध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या फेडररचा ६-४, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत फेडरर तब्बल सातवेळा चॅंपियन ठरला आहे. तर पहिल्यांदाच अंतिम सामन्यात हरला आहे. जोकोविचने सामना जिंकल्यानंतर ट्वीट करून ‘स्वप्न पूर्ण झाले, असे लिहिले आहे. या स्पर्धेमध्ये जोकोविच एकूण पाच वेळा अंतिम सामने हरला होता. त्यापैकी तीनदा फेडररनेच त्याला हरवले होते. म्हणूनच जोकोविचचा हा विजय खास आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More