‘नाळ’मधील चैत्या ‘छुमंतर’, लंडनमध्ये चित्रीत झालेला सिनेमा लवकरच येणार – eNavakal
मनोरंजन

‘नाळ’मधील चैत्या ‘छुमंतर’, लंडनमध्ये चित्रीत झालेला सिनेमा लवकरच येणार

chumantar marathi movie

लॉकडाऊन शिथील झाल्यावर आणि सरकारकडून चित्रीकरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर अनेक सिनेमांच्या, मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. मराठी सिनेमांनी देखील अनेक ठिकाणी जाऊन योग्य ती काळजी घेऊन चित्रिकरण सुरु केले आणि विशेष करुन ‘छूमंतर’ या मराठी सिनेमाची चर्चा सर्वत्र जोरदार झाली. कारणही तसं विशेषच आहे. नितीन प्रकाश वैद्य निर्मित, समीर जोशी दिग्दर्शित ‘छूमंतर’ चे चित्रिकरण लंडनमध्ये करण्यात आले होते. सध्याच्या काळात परदेशात जाऊन शूटिंग करणे हे तसं चॅलेंजिंगच आहे, पण टीम वर्कमुळे शूटिंग यशस्वीरित्या पार पडले.

‘छूमंतर’ मध्ये प्रार्थना बेहरे, रिंकू राजगुरु, सुव्रत जोशी आणि रिशी सक्सेना हे कलाकार दिसणार आहेत. या सिनेमाचे सरप्राईज काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर उलगडले आहे. ते सरप्राईज म्हणजे महाराष्ट्राचा लाडका ‘चैत्या’ उर्फ ‘नाळ’ फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळे देखील या सिनेमाचा एक भाग आहे. सहज-सुंदर अभिनय, चेह-यावरचा भोळेपणा, बोलण्यातली गोड शैली, त्याच्यातला निरागसपणा, एकंदरीत या त्याच्यातील गुणांमुळे श्रीनिवासने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काची जागा तयार केली आहे. आता त्याच्या या आगामी सिनेमासाठी देखील प्रत्येकजण आतुर असणार यात शंकाच नाही.

निर्माते नितीन प्रकाश वैद्य यांनी यापूर्वी  ‘गच्ची’, ‘नाळ’, ‘मन फकीरा’ यांसारखे अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे आणि आता ते द्विभाषिक मध्ये बनणारा ‘छूमंतर’ हा सिनेमा लवकरच घेऊन येणार आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

‘नाळ’मधील चैत्या ‘छुमंतर’, लंडनमध्ये चित्रीत झालेला सिनेमा लवकरच येणार

लॉकडाऊन शिथील झाल्यावर आणि सरकारकडून चित्रीकरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर अनेक सिनेमांच्या, मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. मराठी सिनेमांनी देखील अनेक ठिकाणी जाऊन योग्य ती काळजी घेऊन चित्रिकरण...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पदवीधर मतदारसंघ निवडणूक: मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

पुणे – पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून, सर्वच उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. अशात शनिवारी खबळबळ उडवून देणारी घटना घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

भंगारातून लाखो रुपयाची दारू वाहतूक! दोघांना अटक

सिंधुदुर्ग प्रतिनिधी तुटलेल्या काचेच्या भंगारातून लाखो रुपयाची दारू वाहतूक केल्याप्रकरणी नांदेड व उत्तरप्रदेश येथील दोघांना राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांनी मोठ्या शिताफीने अटक केली.त्यांच्याकडून तब्बल...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

कराचीसुद्धा अखंड भारताचा भाग असेल, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

नवी दिल्ली -एक दिवस कराचीसुद्धा अखंड भारताचा भाग असेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसंच, त्यांनी अखंड भारत या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

जुन्नर तालुक्यातील गाडलेल्या ४ लेणी समुहांचा शोध

नारायणगाव *  जुन्नर तालुक्यातील पाडळी येथील डोंगररांगांत  नवीन ४ लेणी समुहांचा शोध लागल्याची माहिती माजी सैनिक व वनरक्षक रमेश खरमाळे यांनी दिली.असून हे चारही...
Read More