गलवानमधील संघर्षात ठार झाले ५ जवान, चीनची कबुली – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश विदेश

गलवानमधील संघर्षात ठार झाले ५ जवान, चीनची कबुली

लडाख – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जूनला झालेल्या चीन-भारत जवानांच्या संघर्षात किती सैनिक मारले गेले याची माहिती चीनकडून आतापर्यंत देण्यात आली नव्हती. मात्र आता प्रथमच चीनने कबुली देत या संघर्षात आपले ५ सैनिक मारले गेल्याचे मान्य केले आहे. यात चीनी सैन्याच्या एका कमांडिंग अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. माल्डो येथील चर्चेत चीनने ही गोष्ट मान्य केली आहे. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते.

चीनने भलेही ५ सैनिक मारले गेल्याचा दावा केला असला तरीही अमेरिका आणि भारताच्या गुप्तचर एजेंसीनुसार या संघर्षात चीनचे कमीत कमी ४० जवान मारले गेले आहेत. सध्या पूर्व लडाखच्या देपसांग, पेंगोंग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिणेकडे, पेट्रोलिंग प्वाइंड १७ ए, रेजांग ला आणि रेचिन ला येथे दोन्ही देशांचे सैनिक समोरसमोर आहेत. या संघर्षानंतर भारताने चीनला स्पष्ट केले होते की, धक्काबुक्की आणि झडप अशी कारवाई अजिबात सहन केली जाणार नाही.

भारतीय अधिकाऱ्याने सांगितले की चीनला स्पष्ट करण्यात आले आहे की त्यांच्या सैनिकांकडून पारंपारिक शस्त्रांचा वापर केला गेल्यास, भारतीय सैनिक गोळीबार करण्यास देखील मागे पुढे पाहणार नाहीत. चर्चेदरम्यान, चीनने पेंगोंग सरोवराजवळील उंचीवरील भागातील सैन्य भारताने मागे घ्यावे असे चीनने म्हटले. यावर भारताने संपुर्ण पुर्व लडाख भागातील स्थितीचे निराकरण करण्याविषयी जोर दिला

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

गलवानमधील संघर्षात ठार झाले ५ जवान, चीनची कबुली

लडाख – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जूनला झालेल्या चीन-भारत जवानांच्या संघर्षात किती सैनिक मारले गेले याची माहिती चीनकडून आतापर्यंत देण्यात आली नव्हती. मात्र...
Read More
post-image
देश

सुसाट बसची वाहनांना धडक, ७ जणांना चिरडले, ३ ठार

नवी दिल्ली – यमुनापार नंद नगरीतील बस डेपोसमोर बेदरकार बसने काल रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास हाहाकार माजवला. या बसने अनेक वाहनांना धडक दिली. रस्त्यावरील ७...
Read More
post-image
देश

उमर खालिदच्या सुटकेसाठी 200 जणांचे संयुक्तिक पत्र

नवी दिल्ली – दिल्ली दंगलप्रकरणी अटकेत असलेल्या उमर खालिद याची सुटका करावी या मागणीसाठी आता शिक्षणतज्ज्ञ, कलाकार आणि लेखक मंडळींचा एक गट पुढे सरसावला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

चीनने डोकलामजवळ तैनात केली अणू बॉम्बर आणि क्रूझ क्षेपणास्त्रे

बीजिंग – पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चा सुरू असली तरी पाठीत सुरा खुपसण्याचा चीनचा पवित्रा अजूनही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

खड्डयात दुचाकी आदळून ठाण्यातील कला दिग्दर्शकाचा जागीच मृत्यू

भिवंडी – भिवंडी-वसई मार्गावरील खड्ड्यांनी आणखी एकाचा बळी घेतला आहे. खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एका कला दिग्दर्शकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हर्ष विनोद...
Read More