सहा डिसेंबर आधी दादरचे नाव बदला नाहीतर…भीम आर्मीचे आव्हान – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

सहा डिसेंबर आधी दादरचे नाव बदला नाहीतर…भीम आर्मीचे आव्हान

मुंबई – सदा प्रवाशांनी गजबजेल्या दादार स्थानकाचे नाव बदलून त्या स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे नाव देण्यात यावे, यासाठी भीम आर्मीने रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले होते. त्यासंदर्भात कोणतीच भूमिका सरकारकडून न घेतल्याने मुख्यमंत्र्यांना भीम आर्मीकडून इशारा देण्यात आला. जर येत्या सहा डिसेंबर पर्यंत मुंबईतील दादार स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस हे नाव देण्यात यावे, नाहीतर चैत्यभूमीमध्ये मुख्यमंत्र्यांना पाय ठेवायला देणार नाही, असे आव्हान भीम आर्मी या सामाजिक संघटनेकडून करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दादार या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी आहे. बाबासाहेबांचे निवासस्थान तसेच आंबेडकर चळवळीचे केंद्र दादर याठिकाणी आहे. 6 डिसेंबर रोजी देशभरातून हजारो नागरिक चैत्यभूमीवर येत असतात, तसेच मुख्यमंत्री, प्रधानमंत्री देखील इथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित असतात, इतके महत्वाचे ठिकाण असूनसुध्दा महाराष्ट्र सरकार याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे भीमसेनेने हे थेट आव्हान दिले असल्याचे भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे आणि महासचिव सुनील थोरात यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ७४८, मुंबई डेंजर झोनमध्ये?

मुंबई – आज राज्यात दिवसभरात ११३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४८ झाली आहे. तर, आतापर्यंत ५६ जणांनी कोरोनापासून स्वत:ची सुखरूप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वाढता वाढे आकडा! मुंबईत कोरोनाचे ४३३ रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चिंताही वाढत जातेय. त्यातच मुंबईकरांसाठी रोज धडकी भरवणारे आकडे समोर येत असल्याने मुंबईकरांनी आणि आजूबाजूच्या...
Read More