कोथरुडमध्ये ५ रुपयांत मिळणार घरपोच भाजीपोळी – eNavakal
महाराष्ट्र

कोथरुडमध्ये ५ रुपयांत मिळणार घरपोच भाजीपोळी

पुणे – कोरोनाचा विळखा सैल करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पण लॉकडाऊनमुळे अनेक गरिबांना एकवेळचं जेवणही मिळणं मुश्कील झालं आहे. या समस्येवर मात करण्यासाठी पुण्यातील कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मतदारसंघात पाच रुपयात घरपोच पोळी भाजी देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी एक व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला असून या क्रमांकावर तुमची माहिती दिल्यास, तुम्हाला घरपोच पोळीभाजी मिळणार आहे. तसेच, आजारी व्यक्तींनी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन दाखवल्यास त्यांना घरपोच २५ टक्के डिस्काऊंटमध्ये औषधं प्राप्त होणार आहे.
चंद्रकांत पाटील यांनी 8262879683 हा व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. यानुसार तुम्ही सकाळी १० वाजेपर्यंत पोळीभाजीची मागणी केली आहे. नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर व्हाट्सअप मेसेज करून तुमची माहिती द्यावी लागणार आहे. यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत पोळीभाजी घरपोच दिली जाणार आहे. तसेच संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मागणी केल्यावर रात्री 9 वाजेपर्यंत पोळीभाजी घरपोच मिळणार आहे.

औषधं घरपोच देण्यासाठीही चंद्रकात पाटील यांनी मदत जाहीर केली आहे. ज्यांना औषधांची गरज आहे आणि डॉक्टरांनी नियमित घ्यायला सांगितली आहेत, अशा नागरिकांना २५ टक्के सवलतीच्या दरात घरपोच प्रिस्क्रिप्शननुसार औषध पोहोचवणार आहेत. त्यासाठी या क्रमाकांवर 9922037062 संपर्क साधायचा आहे.
सायंकाळी ६ वाजता प्रिस्क्रिप्शन, नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक वरील क्रमांकावर व्हॉट्सअॅप करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी औषधं घरपोच केली जाणार आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More