#BuddhaPurnima आज जगभरातील अनेक देशांमध्ये बुद्धपौर्णिमेचा उत्साह – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#BuddhaPurnima आज जगभरातील अनेक देशांमध्ये बुद्धपौर्णिमेचा उत्साह

नवी दिल्ली – वैशाख पौर्णिमेला साजरा केला जाणारा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे बुद्धपौर्णिमा. ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची असते. याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचं महानिर्वाण झालं होतं. अशा तीन कारणांसाठी बुद्धपौर्णिमा महत्त्वाची मानली जाते. गौतम बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक होते. यंदा 18 मे दिवशी 2019 बुद्धपौर्णिमा साजरी केली जात आहे.

केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांत बुद्धपौर्णिमा साजरी केली जाते. यात श्रीलंका, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, नेपाळ, थायलंड, मलेशिया, म्यानमार, इंडोनेशिया आणि पाकिस्तान या देशांचाही समावेश आहे. श्रीलंकेत बुद्ध पौर्णिमेला ‘वेसाक’ असं म्हणतात. या दिवशी बौद्ध भिक्षुक ठिकठिकाणच्या बुद्ध विहार आणि मठांमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करतात. बुद्धांच्या मूर्तीसमोर दीप लावतात. विहार रंगीबेरंगी पताक्यांनी सजवली जातात. बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प या दिवशी केला जातो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

आसाममध्ये भूकंपाच्या धक्क्याने घबराट

गुवाहटी – मुसळधार पावसामुळे पूरस्थितीत अडकलेल्या आसाममध्ये आज दुपारी भूकंपाचा धक्का जाणवला. दुपारी २.५१ वाजता झालेल्या या भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता ५.९ इतकी होती....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

प्रचारासाठी मी पुन्हा येणार आहे, तेव्हा निवडणुका जिंकूच! आदित्य ठाकरे

धुळे – युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही. नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी आहे’, असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

प्रियंका गांधींचे पहिले धरणे आंदोलन! पोलिसांनी घेतले ताब्यात

नवी दिल्ली – काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटण्यासाठी निघाल्या. परंतु मिर्झापूरमध्ये त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सोनभद्रमध्ये जाण्यापासून पोलिसांनी रोखले. त्यामुळे प्रियंका यांनी मिर्झापूरमध्ये धरणे...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सोज्वळ अभिनेत्री उमा भेंडे

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३१ मे १९४५ साली कोल्हापूर येथे झाला. सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा भेंडे यांनी मराठी रसिक मनावर...
Read More