मुंबईच्या महापौरांना भाजपच्या ६५ नगरसेविकांच्या स्वाक्षरीचं पत्र धाडलं – eNavakal
महाराष्ट्र मुंबई

मुंबईच्या महापौरांना भाजपच्या ६५ नगरसेविकांच्या स्वाक्षरीचं पत्र धाडलं

मुंबई – कोविड सेंटरच्या उभारणीचं कंत्राट मुलाला देणं, कंगना रानौतचं कार्यालय पाडणं आदी विषयांमुळे चर्चेत असलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजपच्या ६५ नगरसेविकांच्या स्वाक्षरीचं एक पत्र महापौरांना लिहिलं असून या पत्राद्वारे विशेष महासभा आयोजित करण्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येतंय.

विविध मुद्द्यांना बगल देता यावी करता महापौर महासभेचं आयोजन करत नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. त्यामुळे भाजपच्याच मुंबईतील नगरसेविकांनी त्यांना पत्र धाडलं आहे. त्यानुसार, येत्या 28 सप्टेंबरला ही विशेष महासभा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने आपली साथ दिली तर महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर होईल, अशी आशा भाजपला आहे, अशी माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.

काय आहे वाद?

कोरोनाकाळात मुंबई महापालिका प्रशासनानं अनेक वस्तूंची जास्त दरात खरेदी केली आहे. याबाबत अनेक वेळा तक्रार करण्यात आली आहे. पण त्याकडे कुणी लक्षच देत नाही असा भाजपचा आरोप आहे. मनमानी कारभार करणाऱ्या मुंबई महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पालिका सभागृहाची बैठक आयोजित करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. याबाबत अन्य पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे.

‘या’ मुद्द्यांमुळे मुंबईच्या महापौर अडकणार?

मुंबईतील विविध विषयांवरुन महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप अविश्वास प्रस्ताव करणार आहे. यामध्ये अनेक मुद्द्यांचा समावेश आहे.

सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्ष भाजपनं आणखी कंबर कसली आहे. कोविड 19 च्या मुद्द्यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप अविश्वास ठराव मांडणार आहे. मुंबईत अद्याप कोरोना रुग्णांवर नियंत्रणत आणण्यात यश आलेलं नाही. मुंबईतील रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे तर मृत्यूदराचा आलेखही वाढता आहे.

RT-PCR चाचण्या वाढविण्यात आलं नाही. तर जेवणाचे चुकीचं 63 कोटीचे कंत्राट दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. याशिवाय चढ्या दराने फेस शिल्ड आणि मास्कची खरेदी मुंबईत करण्यात आली असून विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनाचं हे कंत्राटं दिल्याचाही भाजपने दावा केला आहे. यावेळी ई टेंडरला बगल दिली गेल्याचे भाजपने आपल्या अविश्वास प्रस्तावात म्हटले आहे.

शिवसेनेचा अर्थसंकल्पातला वाटा 73 टक्के, भाजपचा 13 टक्के आहे. व्हीसीद्वारे फक्त स्वत:च्या सदस्यांना बोलू दिलं व त्यांच्यासमोर अर्थसंकल्प मंजूर केला. दुसरीकडे बेस्टची भरमसाठ बिलवाढ हा देखील मुद्दा त्यांच्या अविश्वास ठरावात नमूद करण्यात आला आहे.

संकट काळात बेस्ट बस कर्मचा-यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. शिवाय 113 टक्के नालेसफाईचा दावा करण्यात आला होता, मात्र करीही मुंबई तुंबली का ? असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. त्यामुळे भाजपाचा महापौरांविरोधातला अविश्वास ठरावही लवकर मांडता येणार नाही आहे. कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मुंबईच्या महापौरांना भाजपच्या ६५ नगरसेविकांच्या स्वाक्षरीचं पत्र धाडलं

मुंबई – कोविड सेंटरच्या उभारणीचं कंत्राट मुलाला देणं, कंगना रानौतचं कार्यालय पाडणं आदी विषयांमुळे चर्चेत असलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोविड योद्धेच कोरोनासंक्रमणात, गेल्या २४ तासांत २४७ पोलिसांनी लागण

मुंबई – कोरोनाविरोधात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात २४७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलंय....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

‘अर्थव्यस्थेला गती देण्याकरता खासगी क्षेत्रांनीही योगदान द्यावं’, शक्तिकांत दास यांचे आवाहन

नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे देशाचं अर्थचक्र बिघडलं आहे. त्यामुळे आता अनलॉकच्या प्रक्रियेत देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी रिझर्व्ह बँक...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोरोनामुक्त झाल्यावर होम क्वारंटाइन असलेल्या इसमाने केली आत्महत्या

पुणे – एकीकडे पुण्यात कोरोनाचा हाहाकार वाढत असतानाच रुग्णांमध्ये नैराश्येचं प्रमाणही वाढत आहे. कोरोनामुक्त झालेल्या एका इसमाने नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दर्शनासाठी निघालेली बोट ४५ प्रवाशांसह उलटली, तिघांचे मृतदेह सापडले

कोटा – ४५ प्रवाशांना घेऊन कमलेश्वर धाम दर्शनासाठी निघालेली बोट राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील चंबळ नदीत उलटली आहे. या बोटीत पुरुषांसह महिला आणि लहान मुलंही...
Read More