#Bond25 पहिली महिला साकारणार ‘AGENT 007’ – eNavakal
मनोरंजन

#Bond25 पहिली महिला साकारणार ‘AGENT 007’

किंग्स्टन – जगप्रसिद्ध बॉन्ड सिरीजचा २५ वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘सीक्रेट एजंट ००७’ ही अतिशय गाजलेली भूमिका यावेळी कोणी अभिनेता नाही तर एक अभिनेत्री साकारणार आहे. ‘बॉन्ड’फेम अभिनेता डेनियल क्रेगच्या जागी या भूमिकेत कॅप्टन मार्वल फायटर लशाना लिंच दिसणार आहे. तसेच या चित्रपटात अनेक बदल दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लशानाने आपल्या सीक्रेट एजंट ००७ भूमिकेबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. लशाना कॅप्टन मार्वल चित्रपटात फायटर पायलट मारिया राम्बेऊच्या भूमिकेत दिसली होती. या भूमिकेला जगभरातील चाहत्यांनी पसंत केले. त्यामुळे ००७च्या रुपातील तिचा हा नवा अंदाज पाहण्यासाठी आता प्रेक्षकही उत्सुक आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉंड सिरीजच्या पुढील चित्रपटात, डेनियल क्रेग एम-16 एजन्सीतून निवृत्त झाला असून सध्या जमैकामध्ये राहत आहे. परंतु एका मिशनसाठी त्याला पुन्हा बोलावण्यात येते. ही त्याची अनपेक्षित अनपेक्षित एंट्री असणार आहे. दरम्यान, आतापासून चित्रपटाच्या कथानकाविषयी चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

Cat’s finally outta the bag! #BOND25

A post shared by Lashana Lynch (@lashanalynch) on

 

View this post on Instagram

 

A lickle taste… #B25

A post shared by Lashana Lynch (@lashanalynch) on

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

सातारा,- कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही मानवनिर्मित आहे, असा दावा करून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी असे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य

जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शक्ती केेंद्र...
Read More
post-image
News मुंबई

जोगेश्वरीत किटकनाशक पिऊन नवविवाहीत महिलेची आत्महत्या

मुंबई – जोगेश्वरी येथे एका 25 वर्षांच्या नवविवाहीत महिलेने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनी रोहित चौरसिया असे या महिलेचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नरेेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण! विक्रम भावेचा जामीन फेटाळला

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोेपी म्हणून अटक करण्यात आलेल्या विक्रम भावेचा जामीन अर्ज आज जिल्हा सत्र...
Read More
post-image
News महाराष्ट्र

विक्रमगडमधील पूल मोजताहेत शेवटची घटका

विक्रमगड – तालुक्यातील अनेक वर्षापासूनचे पूल मोडकळीस आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ब्रिटीशकालीन विक्रमगड-गडदे मार्गावरील तांबडी नदीचा पूल, साखरे गावातील देहेर्जे नदीवरील पूल, नागझरी बंधारा...
Read More