सिद्धीविनायक मंदिराने राज्य सरकारला केलेली मदत वादाच्या भोवऱ्यात, बेकायदा व्यवहार झाल्याचा दावा – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सिद्धीविनायक मंदिराने राज्य सरकारला केलेली मदत वादाच्या भोवऱ्यात, बेकायदा व्यवहार झाल्याचा दावा

मुंबई – कोरोनाकाळात शिवभोजन योजनेसाठी आणि कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराने राज्य सरकारला १० कोटींची मदत केली होती. मात्र, ही मदत आता वादाच्या भोवऱ्यात सापडली असून एका याचिकाकर्त्याने याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. तसेच, नजीकच्या काळात मंदिराने आणखी ३० कोटींची मदत केल्याचाही दावा करण्यात आला आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कायदा 1980 नुसार हा व्यवहार बेकायदा असल्याचा आरोप करण्यात आला असून  ट्रस्टला अश्या पद्धतीनं सरकारी उपक्रमांना आर्थिक मदत करण्याचे अधिकारच नसल्याचा दावा करत ॲड. लीला रंगा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे यावर शुक्रवारी प्राथमिक सुनावणी पार पडली. त्यावेळी ज्येष्ठ वकील प्रदिप संचेती यांनी याचिकाकर्त्यांच्यावतीनं कोर्टाला सांगितलं की, यासंदर्भातील कायद्याच्या कलम 18 नुसार ट्रस्टचा पैसा हा त्यांची इमारत किंवा मालमत्ता असलेल्या इतर वास्तूंच्या दुरूस्तीसाठी वापरता येऊ शकते किंवा शाळा, इतर शैक्षणिक संस्था, रूग्णालय, दवाखाने यांच्यासाठीच वापरता येऊ शकतो.

काही विश्वस्तांची मुदत या महिन्यांत संपणार आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा मुदतवाढ देऊ नये अशी मागणीही या याचिकाकर्त्याने केली आहे. मात्र, हायकोर्टान ती नाकारली आहे. तसेच सिद्धिविनायक न्यासाचे विद्यमान अध्यक्ष यांना सरकारला ही आर्थिक मदत करताच तीन वर्षांची मुदतवाढ जाहिर करण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केला आहे. तसेच सध्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्यासारखी परिस्थिती नसल्याचंही हायकोर्टानं स्पष्ट केलं. मंदिर ट्रस्टकडून शुक्रवारच्या सुनावणीला कुणीही उपस्थित नव्हतं त्यामुळे याचिकाकर्त्यांना तूर्तास कोणताही दिलास देण्यास हायकोर्टानं नकार दिला. मात्र, राज्य सरकार आणि सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टला नोटीस जारी करत चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. या याचिकेवर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणं अपेक्षित आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सिद्धीविनायक मंदिराने राज्य सरकारला केलेली मदत वादाच्या भोवऱ्यात, बेकायदा व्यवहार झाल्याचा दावा

मुंबई – कोरोनाकाळात शिवभोजन योजनेसाठी आणि कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराने राज्य सरकारला १० कोटींची मदत केली होती. मात्र, ही मदत आता वादाच्या भोवऱ्यात सापडली...
Read More
post-image
देश

येत्या काळात निवडणुकांसाठी काय असतील नियम? निवडणूक आयोगाची नियमावली जाहीर

नवी दिल्ली – कोरोना काळात निवडणुकांचं आयोजन कसं करावं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाने याबाबात नियमावली जारी...
Read More
post-image
अर्थ देश

अनिल अंबानींची दिवाळखोरी, NCLTने दिले कारवाईचे आदेश

नवी दिल्ली – कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने ( NCLT)अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ADAG)चे मालक अनिल...
Read More
post-image
देश

श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पात भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू

हैदराबाद – ठिकठिकाणी आगीच्या घडत असून तेलंगणातील श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पातही गुरुवारी भीषण आग लागली होती. या आगीत जवळपास ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गुरुवारी...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डोंबिवलीतील कोविड रुग्णालयाचे ऑनलाइन उद्घाटन

कल्याण – एकजिनसीपणे संघटितपणे कोविड निर्मूलनाचे काम हाती घेतले आहे, त्‍यामुळे महाराष्‍ट्राला लवकरात लवकर या संकटातुन बाहेर काढू, असा आशावाद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज व्‍यक्‍त केला. डोंबिवली जिमखाना, येथे...
Read More